वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज जाधव यांनी व्यक्त केली निष्ठा
रुपाली मेश्राम चित्रा न्युज
यवतमाळ : वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी आपल्या रक्ताने बाळासाहेबांची रेखाटलेली प्रतिमा बाळासाहेबांना भेट देऊन पक्षाप्रती आणि आपल्या नेत्याप्रती असलेली निष्ठा व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आरक्षण बचाव यात्रा राज्यातील अनेक भागांतून जात आहे. ही यात्रा यवतमाळ येथे आली असताना यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते. 7 ऑगस्ट रोजी या यात्रेची औरंगाबाद येथे समारोप सभा होणार असून त्या दिवशी मंडल दिवस साजरा करण्यात येणार आहे.


0 टिप्पण्या