Ticker

6/recent/ticker-posts

भारत बंद च्या समर्थनात अणदूर शहर बंद ठेवण्यात यावे ऑल इंडिया पँथर सेनेचे नळदुर्ग पोलिस स्टेशनला निवेदन साजर


मिलिंद गायकवाड चित्रा न्यूज मो 9860179256 



 धाराशिव: - दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी भारत बंद मध्ये सहभागी  होतं आहे 
 एस सी, एस टी समाज 

 संत महापुरुषांनी सामाजिक एकता निर्माण करणेसाठी जनजागृती केली. महत्पर्यासाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती तोडून विविध जातींचा प्रवर्ग निर्माण केला त्याला सामाजिक एकता निर्माण झाली, अन्याया विरुध्द लढण्याची कुवत निर्माण झाली. मात्र इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नितीप्रमाणे अनुसुचित जाती जमातीमधील एकता तोडून या प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा तथा सर्व प्रवर्गाला किमीलियर लावणेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अनुसुचित जाती जमातीचे आरक्षण संपुष्टात येणार आहे. तसेच आरक्षण हे अर्थिक आधाराचे संकल्पनेवर नसून वर्षानुवर्षाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक मागासलेपणा या संकल्पनेवर आधारीत आहे. या निर्णयाविरोधात अनुसुचित जमातीमधील सर्व समाजाच्या वतीने बुधवार दिनांक 21ऑगस्ट २०२४ रोजी सामुहीक भारत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये अणदूर शहर व एस सी, एस टी समाज सहभागी होत असुन दिनांक 21ऑगस्ट २०२४ रोजी
अणदूर शहर बंद ठेवण्यात येणार आहे
 तरी निवेदन देता वेळी   ऑल इंडिया पँथर सेनेचे तुळजापूर युवक तालुका उपाध्यक्ष.  महादेव जेटीथोर. संजय कांबळे. अभिषेक उबाळे. सुशांत बनसोडे.   निखिल कांबळे  ऋषिकेश कांबळे
अभिषेक सूर्यवंशी  हे कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या