मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :- वसमत शहरात शाळा , महाविदयालय , खाजगी शिकवणी वर्ग चालणाऱ्या अनेक ठिकाणी मुलींना छेड छाड करूण त्रास देणाऱ्या रोड रोमीयो चे मनोबल वाढले असुन त्यांच्या वर चांगले संस्कार करण्यासाठी चिडीमार पथक ,दामीनी पथक सक्रीय करणे आवश्यक झाले आहे.
शहरातील नवीन बस स्टॅन्ड, कॉलेज रोड , गार्डन समोर, पंचायत समिती समोर , नांदेड रोड , परभणी रोड , वसमत च्या सर्व शाळा परिसरात शाळा भरण्या व सुटण्याच्या वेळेत हे रिकामटेकडे रोड रोमिओ फिरून शाळकरी मुलींना त्रास देत आहे सागर लाँजच्या पाठिमागे टिवीशन.. सिध्देश्वर शाळेजवळचा पूर्ण परिसर टिवीशन ..बँक काँलनीतील अहिल्याबाई होळकर शाळेजवळचा परिसर.हे सर्व पाँईंट खूपच त्रासदायक झाले आहेत विद्यार्थीनीना त्रास सहन करावा लागत असुन या रोमीयोंचे आपसात मारा मारीचे प्रकार घडून भांडन ..वाद होत आहेत त्यांच्या ही माय बापांचे नुकसानच हाेत आहे. यांच्या आपसातील मारहाणीत गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या रोड रोमिओ ची शाळा भरवुन त्यांच्या पालकासमक्ष त्यांना धडा शिकवणे गरजेचे बनले आहे मुलींना माणसीक दृष्टीने सक्षम बनवीण्यासाठी त्यांचेही प्रबोधन होने आवश्यक आहे .पोलीस प्रशासनाने त्वरीत दखल घेऊण तातडीने कार्यवाही करावी अशी सामान्य जनतेतून मागणी व विनंती होत आहे .


0 टिप्पण्या