Ticker

6/recent/ticker-posts

जामखेडच्या आरोळी वस्ती झोपडपट्टी रहिवासी यांना सरकारी दिलेल्या जमिनी मालकी हक्काने मिळावे...महिला सह नागरिकांनी तहसीलदारला दिले निवेदन...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098

जामखेड :- जामखेड शहरातील आरोळे वस्तीवरील झोपडपट्टी येथील रहिवासी यांना भोगवटदार म्हणून सरकारी दिलेल्या जमिनी ह्या मालकी हक्काने ताब्यात देण्यात याव्यात व सर्व सरकारी योजनेचा लाभ झोपडपट्टी धारकांना मिळावे व घरपट्टी कमी करण्यात यावी
असे निवेदन तहसीलदार गणेश माळी यांना महिला सह ग्रामस्थानी दिले.

जामखेड शहरातील आरोळे वस्ती झोपडपट्टी येथील रहिवासी असुन यांना ह्या रहिवासी नागरिकांना सरकारी जागा देण्यात आलेली आहे सदर सरकारी जागेची नगरपरिषद ला नोंदी असुन मालकी हक्कात सरकार नाव आहे व भोगवटदार म्हणून आमचे  नावे आहेत परंतु झोपडपट्टी धारकांना यामध्ये कुठलाही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही यांची सदरची जागा ही मालकी हक्कात देण्यात यावी व झोपडपट्टी येथील लोंकाना सरकारी योजनेचा लाभ मिळावा या मध्ये विशेष करून घरकुल, लाईट, पाणी व नगरपरिषदेच्या सर्व सुविधा आहेत त्या  आम्हाला देण्यात याव्यात तसेच आमचा हा उतारा जामीन घेण्यासाठी न्यायालयात व सरकारी योजने साठी चालू करावे  उतारा हा आमचा मालकीहकात नसल्याने व आम्हाला सरकारचा लाभ मिळत नसल्याने आम्हा लोंकाचे खुप मोठी अडचन होत आहे आमच्या लोंकासाठी कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेण्यात येत नाही या मुळे आमच्या सर्व मागण्या मान्य करा अन्यथा आम्ही मोठे आंदोलन करू असा इशारा झोपडपट्टी धारकांनी दिला आहे या वेळी तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देताना मधुकर पवार, संतोष गव्हाळे, श्रीराम पवार,  प्रमोद गव्हाळे, योगेश घायतडक, घनश्याम पवार, श्रीरंग माने, दीपक शिंदे, शिवम घायतडक, रामदास रिटे, दीपक शिंदे, मोहन चव्हाण, आजिनाथ लोंढे, बारीकराव लोंढे यांच्या सह महिला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या