Ticker

6/recent/ticker-posts

जामखेड नागपंचमी आनंदनगरी वादाच्या भोवऱ्यात !तहसील कार्यलायसमोर संतोष गव्हाळे,अभिजित राळेभात यांचे उपोषण सुरू....

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098

जामखेड:-   राज्यात प्रसिद्ध असलेल्या नागपंचमी यात्रेतील आनंदनगरी वादाच्या भोवऱ्यात सापडली असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेचा लिलाव ऑन कँमेरा न करता मनमानी पद्धतीने ठेकेदाराला देण्यात आली आहे याबाबत तातडीने देण्यात आलेला लिलाव रद्द करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे ,युवा नेते अभिजित राळेभात यांनी तहसील कार्यलयासमोर उपोषण केले आहे.

याबाबत तहसीलदार गणेश माळी याना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले जामखेडमध्ये नागपंचमी निमित्ताने आनंदनगरी यात्रा उत्सव हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या जागेत दरवर्षी भरवला जाऊन ऑन कँमेरा लिलाव होऊन लिलाव जाहीर करण्यात येत होता परंतु असे न करता यावर्षी गोपनीय पद्धतीने ठेकेदाराला जागा देण्यात आली आहे तरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ व सचिव यांनी लिलाव न करता सदरील जागा एका ठेकेदाराला दिली असे तोंडी सांगत आहेत यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला असून त्यामुळे सदर जागेत जाहीर लिलाव व्हावा अशी मागणी निवेदत करण्यात आली आहे दरम्यान या उपोषणालाविविध पक्षांकडून पाठींबा मिळत आहे यावेळी प्रमोद गव्हाळे.
     मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टाफरे,माजी सरपंच गफ्फार पठाण,बापूसाहेब कार्ले,शिवम घायतड्क तुषार शिरोळे,विक्रम डाडर,सोनू वाघमारे,युवराज डाडर,किंग डाडर,मधुकर पवार आदींसह नागरिक उपोषणास बसले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या