Ticker

6/recent/ticker-posts

"आनंददायी शनिवार राखींचा वार" साकोलीत


जिल्हा परिषद प्राथ. शाळा सेंदूरवाफात विद्यार्थ्यांनी बनविल्या राख्या


रवी भोंगाने साकोली
साकोली : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सेंदुरवाफा १ येथे "आनंददायी शनिवार राखींचा वार" हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला.  व हा उपक्रम विद्यार्थ्यांना आनंद देऊन गेला हे उल्लेखनीय. 
       जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा सेंदूरवाफा क्र १ येथे शनिवारी सकाळच्या सत्रात परिपाठानंतर सामुहिक कवायतीने विद्यार्थी उत्साहीत झाले. निवडक उताऱ्याचे विद्यार्थ्यांनी श्रुतलेखन केले. त्यानंतर शिक्षिका हेमलता फुलबांधे, उषा खेडीकर, मुन्नी कटरे, अंजली राऊत, अल्का करेले, सविता ब्राह्मणकर  यांनी रेशीमबंध ( राखी ) कशी बनवायची याचे प्रात्यक्षिक दिले व विद्यार्थ्यांकडून रक्षाबंधनानिमित्त राख्या बनवून घेतल्या. याप्रसंगी रक्षाबंधन कार्यक्रम शाळेमध्ये साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक ए. बी. मेश्राम, सहा. शिक्षक सुरेश ठाकरे, दीपक वैरागडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सहकार्य केले. स्वनिर्मित राख्या बघून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तर हा आगळावेगळा उपक्रम पाहून पालकवर्गही मुलांच्या गुणकौशल्य पाहून आश्चर्यचकित झाले होते हे विशेष.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या