रवी भोंगाने साकोली
साकोली:- जमनापूर ग्रामपंचायत, साकोली नगरपरिषद आणि बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने जमनापूर ग्रामपंचायतच्या नव्या वसाहतीत विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित, बजिरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमनापूर ग्रामपंचायत सरपंच पूजा देशमुख तर प्रमुख मान्यवर म्हणून उपसरपंच रवींद्र गडपायले, साकोली नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक धीरज राणे, सुहास चौधरी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. आतिश शहारे, डिप्लोमा विभाग प्रमुख प्रा. बिंदल मिश्रा, पर्यवेक्षक रूपलाल पारधी, जमनापूर येथील जेष्ठ नागरिक सुनील साहू, गणेश पाथोडे, महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. संतोष गोटेफोडे तर आभार प्रदर्शन रा.से.यो.विभाग सहाय्यक प्रा. ऋषभ अग्रवाल यांनी केले.


0 टिप्पण्या