रवी भोंगाने साकोली
साकोली :-ग्रामपंचायत महालगांव व केंद्रीय रिझर्व पुलिस बल नागपूर यांच्या सहकार्याने शहीद ताराचंदजी सोनवाणे यांचा २४ वा "शहीद दिन"चा कार्यक्रम सोमवार दि .५ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा करण्यात आला.
यावेळी महालगांव चे प्रथम नागरिक सन्मानीय सरपंच श्री,नंदकिशोरजी कावळे व शहीद ताराचंदजी सोनवाणे यांच्या वीरपत्नी लताताई सोनवणे यांच्या हस्ते शहीद ताराचंदजी सोनवाणे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. या वेळी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय रिजर्व पु.बल नागपूर तर्फे जवान श्री,सुनीलजी राघोर्ते हे उपस्थित होते.यावेळी गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते,त्यांच्याकडून देश भक्ती गीते यावेळी सादर करण्यात आली.या शहीद दिनानिमित्त वृक्षारोपणनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सर्व शाळांमध्ये,रस्त्यांच्या कडेला, स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद ताराचंदजी सोनवाणे यांची आठवण म्हणून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महालगांव चे प्रथम नागरिक व बाजार समिती लाखणीचे संचालक श्री, नंदकिशोरजी कावळे, उपसरपंच ज्योतीताई खोटेले, सर्व ग्रामपंचायत सदस्यगण,त.मु.अध्यक्ष मारोतीजी मारवाडे, माजी पोलीस पाटील भारतजी शेंडे, सेवासहकारी सोसायटी अध्यक्ष गिरीधारी खरकाटे, ग्रामपंचायत सचिव कु. डी.आर,मेश्राम,बाजार समिती संचालक हेमलताताई मेंढे,डॉक्टर कापगते, डॉक्टर,राऊत ,वनरक्षक मेश्राम,डॉक्टर भूषणजी मेंढे ,के. डी.लांजेवार सर,कोरे सर , रहागडाले सर,गावातील सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणा बचत गट सर्व शाळेचे विद्यार्थी,महिला भगिनी, युवक वर्ग त्याचप्रमाणे गावातील ग्रामवाशी मोठया संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या