सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098
जामखेड :- महावितरण कंपनीचे वायरमन मा. सचिन जाधव यांची बदली झाली. व डोणगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आज निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला.
श्री. सचिन रामदास जाधव हे अरणगाव कक्ष येथे 16/07/2017 ला रुजू झाले होते. जाधव हे सध्या सिनियर टेक्निशिअन या पदावर होते.
त्यांनी डोणगाव,पारेवाडी, कवडगाव, गिरवली या चार गावांचा पदभार घेतला होता. त्यांनी चारही गावात 7 वर्ष खूप चांगली सेवा दिली आहे.त्यांना प्रत्येक घरातील ग्राहक त्यांना नावाप्रमांणे माहिती झाले होते. त्यांनी खूप हसून, रमून, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपली ओळख निर्माण केली होती. ज्या ग्राहकांकडे मार्च मध्ये वीज बिल भरण्यासाठी पैसे नव्हते त्या ग्राहकांचे त्यांनी स्वतः हा वीज बील भरत होते. व ग्राहक त्यांनां काही दिवसानंतर पैसे परत देत होते. असे सहकार्य त्यांनी ग्राहकांसाठी करत होते, त्यांनी कोणावरही कनेक्शन तोडण्याची वेळ येऊ दिली नाही, त्यांनी सात वर्षात एकाही ग्राहकाला बँकेत बील भरायला पाठवले नाही ते स्वतःहा बँकेत जाऊन वीज बील भरत होते.
त्यांचे कार्य खूप कौतुकास्पद होते. त्यांना कोणाचाही फोन येऊ ते लगीच फोन उचलून काहीही प्रॉब्लेम असला तरी ते त्यांचे कर्मचारी पाठवायचे व ते सुद्धा येऊन प्रॉब्लेम सोडवायचे. त्यांना पुढील वाटचालीस डोणगाव गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यावेळी ग्रामसेवक सातपुते साहेब, सरपंच आण्णा यादव, पोपट जमदाडे, गणेश डोंगरे, मेजर रामेश्वर यादव,मेजर बाळासाहेब यादव, ग्रा. पं. सदस्य अमोल यादव, आबा पोठरे, माजी सरपंच सुभाष धनवे,माजी सरपंच नितीन वारे, बाबासाहेब धनवे, कांतीलाल धनवे, अशोक यादव, प्रभाकर गायकवाड, सचिन डोंगरे, शा. व्य. समिती अध्यक्ष पोपट मोरे, उपाध्यक्ष सतीश यादव, शिक्षण तज्ञ् अमोल उघडे, अविनाश यादव, कुणाल धनवे, वैभव यादव, माऊली साळवान, पत्रकार सुजित धनवे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या