सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098
जामखेड :- आज स्वतंत्रता दिवस निमित्त इयत्ता दहावी विद्यार्थी यांचा सत्कार व बक्षीस वितरण पाटोदा येथे पार पडले यावेळी सरपंच गफ्फार भाई पठान यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
तरुण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला मान्यता मिळावी यासाठी हा सत्कार व कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना माजी सरपंच गफ्फारभाई पठाण म्हणाले की अशा कार्यक्रमांमुळे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांच्या कलागुणांना योग्य दिशेने वाव मिळेल, असा विश्वास सरपंच गफ्फार पठाण यांनी व्यक्त केला.
शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला
यावेळी माजी सरपंच गफ्फार भाई पठाण,आजु भाई, सुतार ,कल्याण कवादे पाटील, शहाजी नवले, मचींद्र लंगे मामा, सुखदेव शिकारे,पालक विकास शिरसागर, भाऊसाहेब शिंदे, अशोक लबडे तसेच न्यू इंग्लिश स्कूल पाटोदा (जामखेड) शिक्षक वृंद मुख्याध्यापक तोरडमल बी एल, पोदे व्ही एस, खंडागळे बि के, अनारसे व्ही व्ही, बनगर सी बी, पाटील यु एस, वस्तारे एस एस, मार्कडे एस एस, शिंदे ए के, भैलुमे सी झेड, जमदाडे आर पी
व सर्व ग्रमास्थ पाटोदा खामगांव भवरवाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या