Ticker

6/recent/ticker-posts

साकोली विधानसभा मतदारसंघात १० हजार पुरुष मतदार वरचढ

मागोवा निवडणुकीचा- 

रवी भोंगाने साकोली

साकोली:-राजकीय पक्षांची राजकीय गणिते अद्याप जुळली नसली किंवा ती बाहेर आली नसली तरी शासनाचा निवडणूक विभाग कामाला लागलेला आहे.
राजकीय पक्षाबरोबरच निवडणूक विभाग देखील संख्याबळात गुंतला असून मतसंखेत आणि मतदानातही वाढ व्हावी याकरिता निवडणूक विभागाने सक्तीचे पाऊल उचललेले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील निवडणूक विभागाने मतदान नोंदणी, मतदान साक्षरता, वाढीव मतदान आणि मतदानापासून कोणीही वंचित राहू नये ही उद्दिष्ट्ये निवडणूक विभागाने समोर ठेवली आहेत. साकोली विधानसभा मतदारसंघात महिला मतदारापेक्षा १० हजार पुरुष मतदार वरचढ असल्याने पुरुष मतदाराला अधिक महत्त्व आले आहे. मागील भागात आपण एकनिहाय विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी घेतली होती. आता तालुकानिहाय मतदाराची आकडेवारी हाती लागल्याने वाचकांना आणि मतदारांना राजकीय गणित खेळतांना ही आकडेवारी मदतीस येणार आहे. साकोली विधानसभा मतदारसंघात साकोली, लाखनी, लाखांदूर अशा तीन तालुक्यांचा समावेश आहे. सध्याच्या घटकेला संपूर्ण विधानसभा क्षेत्राची मतदार संख्या ३,२४,७९४ आहे. यात १,६२,७३८  पुरुष तर १,५२,०५६ महिला मतदारांचा समावेश आहे. यात एकूण ३७९ मतदान केंद्राचा समावेश आहे. तालुका निहाय मतदार संख्येचे वर्गीकरण केले असता साकोली तालुक्यात जवळपास ४,००० मतदार इतर दोन तालुक्यापेक्षा जास्त आहेत. साकोली तालुक्यात एकूण १३७ मतदान केंद्र आहेत. यात पुरुष मतदार ५७,५८२,  महिला मतदार ५६, ८०७ तर साकोली तालुक्याची एकूण मतदार संख्या १,१४,३८९ आहे. लाखनी तालुक्यात १२८ मतदार केंद्र आहेत. यात ५५,०१२  पुरुष मतदार तर ५५,६७० महिला मतदार असून लाखनी तालुक्यात एकूण मतदार संख्या१,१०,६८२  आहे. लाखांदूर तालुक्यात ११४ मतदान केंद्र आहेत. यात५०,१४४  पुरुष मतदार तर ४९,५७९ महिला मतदार असून लाखांदूर तालुक्यातील मतदाराची एकूण संख्या ९९,७२३ आहे. इतर तालुक्याच्या मानाने लाखांदूर तालुक्यात मतदान केंद्र,मतदार महिला,पुरुष संख्या कमीच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या