संघटन मंत्री बाळा अंजनकर यांचे प्रतिपादन
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुका भाजपाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित संताजी हॉल लाखनी येथे 12 ऑगस्ट ला संपन्न झाला.यावेळी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे संघटन मंत्री बाळाभाऊ अंजनकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की कार्यकर्त्यांनी जातीपातीच्या राजकारणातून बाहेर निघा आणि जो उमेदवार पक्ष देईल त्याचा काम प्रामाणिकपणे करा. साकोली विधानसभेत संघटनेच्या मजबुतीसाठी प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना लक्ष देऊन एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन केले. त्यांचे हे विधान बरेच काही सांगून जाते. जाणकारांचे असे म्हणणे आहे की साकोली विधानसभेचा विचार केला असता अल्पसंख्याक कोहळी समाजाला पंचवीस वर्षे प्रतिनिधीत्व मिळाले आहे, तसेच कुणबी समाजाला ही प्रतिनिधीत्व मिळाले असून बहुसंख्य असलेला तेली समाजाला आजपर्यंत प्रतिनिधित्व मिळाले नाही. त्यामुळे साकोली विधानसभेत तेली समाजाला प्रतिनिधित्व मिळण्याची दाट शक्यता आहे असे बोलले जात आहे.मंचावर भाजपा भंडारा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, माजी आमदार बाळाभाऊ काशीवार, प्रदेश कार्यकारी सदस्या रेखाताई भाजीपाले, डॉ. श्यामजी झिंगरे, डॉ. सुदामजी शहारे, डॉ. सोमदत्त करंजेकर,माजी जिल्हाध्यक्ष शिवराम गिर्हेपुंजे, भाजपा तालुका अध्यक्ष श्रावण कापगते, शहराध्यक्ष सत्यवान वंजारी, अशोक गायधने ,पद्माकर बावनकुळे , डॉ. विजयाताई नंदुरकर, घनश्याम खेडीकर, लताताई रोडे, उमरावजी बावनकुळे व मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या