Ticker

6/recent/ticker-posts

वसमत येथे दिवसा ढवळया सेवा निवृत्त कर्मचाऱ्यास लुटले

मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-वसमत शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मोंढा रोड वर न .प. सेवानिवृत्त कर्मचारी श्री सुर्यकांतराव बोड्डेवार यांचे चार अज्ञात चोरांनी दिवसा ढवळया 22000/- रूपये लुटून पसार झाले. 
    या बाबत सविस्तर वृत असे की ,सेवा निवृत्त कर्मचारी श्री. बोड्डेवार हे दुपारी बाराच्या सुमारास एस.बि.आय .बॅंक ,मोढा रोड ,जुनी तहसिल परिसर येथुन आपले सेवा निवृत्ती चे वेतन उचलून घराकडे जात असताना,  तहसिलदार वसमत यांचे शासकीय निवास स्थाना समोर चार अज्ञात युवक एका अँटो मध्ये आले आणि त्यांनी बळजबरी रिटायर कर्मचारी यांना अँटो मध्ये बसवुन तेथुन कारंजा चौका  दरम्यान त्यांच्या खिशातील रुपये बाविस हजार ( 22000/-) काढून घेतले, दिवसाढवळ्या बारा वाजेच्या सुमारास घडलेल्या लुटमारी मुळे शहरातील जेष्ठ  नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनास  चोरांनी एकप्रकारचे अव्हांन दिले असुन यापूर्वी सुध्दा शहरातील गजबजलेल्या बॅंक परिसरात असे प्रकार घडले आहेत. आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, गंभीर बाब समोर आली आहे ती म्हणजे शहरातील सि.सि. टि.व्ही. कॅमेरे केवळ शोभेच्या वस्तू म्हणून अस्तित्वात आहेत. एकही कॅमेरा चालू नाही. शहरातील सर्व कॅमेरे अदयावत करूण ते सुरू करावेत जेणे करूण भविष्यात अशा प्रकारची गंभीर घटना घडली तर आरोपीना गजाआड करणे पोलीसांना सोपे होईल . प्रत्येक घटनास्थळी प्रसंगी पोलीस उपस्थीत राहू शकत नाही परंतू यंत्रना सज्ज असणे आवश्यक आहे प्रशासनाने नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व कॅमेरे सुरु करावेत अशी चर्चा जनतेत होताना दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या