Ticker

6/recent/ticker-posts

कोका जंगल येथील वनवैभव आदि.आश्रम शाळेच्या आवारात वनमहोत्सव साजरा करून मुलांनी वृक्षांचे संवर्धन करण्याचे संकल्प केले





हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज
भंडारा:कोका जंगल च्या निसर्ग रमणीय परिसरातील वनवैभव आदिवासी आश्रम शाळा च्या वतीने शाळा परिसरात आवळा,कडुनिंब,करंज,बेहडा, गुलमोहर ई.प्रजातीच्या झाडांची लागवड करून वन महोत्सव साजरा करण्यात आला..वन वैभव आदिवासी आश्रम शाळा कोका(जंगल),ग्रीन हेरिटेज पर्यावरण संस्था,पतंजली योग समिती (मिस्किंन गार्डन)भंडारा,वनविभाग भंडारा च्या संयुक्त विद्यमाने आयोजित या वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत पंतप्रधान यांचे "एक पेड मां के नाम" च्या आहवान वर आश्रम शाळेच्या आवारात शाळेतील 250 विद्यार्थी, वद्यार्थिनी,योग साधक प्रत्येकानी एक_एक झाडे लावून त्यांचे संरक्षणाचे संकल्प घेतले.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रम प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली  योगसमिती(मिसकिंन गार्डन)चे प्रमुख योग शिक्षक शाम कुकडे, माजी शिक्षणाधिकारी के. झेड. शेंडे,ग्रीन हेरिटेज चे संस्थापक/अध्यक्ष मो सईद शेख,शाळेचे संचालक डॉ्.बाळकृष्ण सार्वे,वामन गोंधुळे,चींधुजी बूधे,अतुल वर्मा आदी सह अनिल शेंडे,ललित बिसेन,रामेश्वर येळणे,पुरुषोत्तम साकुरे,शामराव सार्वे ,अशोक साकुरे , श्रीराम शिवणकर,हरिहर नंदनवार,जगदीश कमाने,बंडू गंथाडे ई मान्यवर सोबतच मोठ्या संख्येने मुले _मुली,शिक्षक_शिक्षिका ई ची उपस्थिती होती.प्रथम मां सरस्वती व शहीद बिरसा मुंडा यांच्या फोटोला पाहुणे हस्ते माल्यारपण करण्यात आले.मुलींनी अतिथी चे गीत व पुष्पगुच्छ द्वारे  स्वागत केले.  प्रमुख पाहुणे व वक्त्यांनी वृक्षारोपण आणि पर्यावरण वर योग्य मार्गदर्शन केले.अतुल वर्मा यांनी आपंनाकडून स्टार आवळ्याचे झाड शाळेचे संचालक डॉ बाळकृष्ण सार्वे यांना भेट दिले.नुकतेच नागपूर विद्यापीठ कडून सम्मानित मो सईद शेख यांचे प्रमुख अतिथी हस्ते पुष्पगुच्छ, टी _शर्ट देवून सत्कार करण्यात आले. शाळेचे अधीक्षक प्रदीप सार्वे यांनी सूत्र संचालन व  आभार प्रदर्शन केले.वनमहोत्सव करीता वनविभागाचे उपवन संरक्षक राहुल गवई,वन क्षेत्राधिकारी संजय मेंढे यांचे सहकार्य लाभले. समारोह नंतर स्वादिष्ट वनस्नेह भोजना चा सर्वांनी आस्वाद घेतला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या