Ticker

6/recent/ticker-posts

अणदूर येथील जवाहर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पोलिसांना बांधल्या राख्या


  
मिलिंद गायकवाड चित्रा न्यूज 



 धाराशिव :- अणदूर रक्षाबंधन सणानिमित्त अणदूर येथील जवाहर महाविद्यालयातील संस्कृतच्या विद्यार्थींनींनी बहीण- भावाचे अतुट नाते सांगणारा रक्षाबंधन हा सण नळदुर्ग येथील पोलिस ठाण्यातील उपस्थित पोलिस बांधवांना राख्या बांधून व औक्षण करुन साजरा केला.  प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही संस्कृत विभाग प्रमुख प्रा. सत्येंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण असणारा आणि भारतीय संस्कृतीत खूप मोठे महत्त्वाचे स्थान आहे असलेल्या अशा पवित्र सणानिमित्त जे पोलिस बांधव आपले कर्तव्य पार पाडत असताना आपल्या घरापासून दूर राहून समाजातील सर्वांचे अहोरात्र संरक्षण करत असतात अशा सर्व पोलीस बांधवांना जवाहर महाविद्यालयातील संस्कृत विषयाच्या प्रीती राजपूत, कोमल सराटे, ज्योति शंकरशेटे, शुभांगी लोंढे,  दिपिका अक्कलकोटे, साक्षी मुळे, मुस्कान पठाण, पल्लवी मनशेट्टी, भक्ती होगाडे, प्रतिक्षा मनशेट्टी, राधिका गायकवाड, स्वाती निकंबे, श्रेया सोनटक्के, माधवी दळवे, कांचन दळवे, पल्लवी चौगुले, प्राची डोकडे, दिव्या लोहार, यशश्री माणिकशेट्टी, स्मिता हब्बू , कीर्ति म्हेत्रे यांनी पोलिस भावाच्या कपाळावर टिळा लावून व त्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या समृद्ध निरोगी जीवनासाठी प्रार्थना केली. यावेळी पोलिस भगिनी तांबोळी यांच्याकडूनही प्रा.सत्येंद्र राऊत यांना राखी बांधण्यात आली. या सामाजिक  उपक्रमाबद्दल पोलीस बांधवांनी डॉ. सत्येंद्र राऊत सर व सर्व विद्यार्थीनींचे आभार मानले. याप्रसंगी पोलिस बांधवांनी  मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही नक्कीच पार पाडू असे वचन दिले.सूत्रसंचालनात  डॉ. सत्येंद्र राऊत यांनी या कार्यक्रमामागील उद्देश सांगितला तसेच कॉलेजच्या मुलींना पोलिस स्टेशनची माहिती व्हावी, समाजाबद्दल जाणिवा निर्माण व्हाव्यात, मोबाईलच्या युगात नष्ट होत असलेले नाते जपावे असे मत व्यक्त केले. यावेळी यशश्री माणिकशेट्टी हिने पोलिस बांधवांना राखी बांधताना माझे मन भरून आले. मी आयुष्यात पहिल्यांदाच पोलिस ठाणे पाहिले या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याची मला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रा. राऊत सर व कॉलेजचे आभार मानले. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने पोलिस बंधुभगिनी उपस्थित होत्या. पोलिस निरीक्षक यांच्या हस्ते सर्व मुलींना पेन भेट देण्यात आले. अशा या सुंदर उपक्रमाबद्दल सहाय्यक पोलिस अधिकार्यांनी तसेच जवाहर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रामचंद्र आलुरे व प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी व उपप्राचार्य डॉ. मल्लीनाथ लंगडे सर यांनी प्रा. राऊत यांच्या अप्रतिम उपक्रमाचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या