मौजा महालगाव येथील श्रमिक शेतकरी श्यामु बुराडे यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी
भवन लिल्हारे चित्रा न्युज
भंडारा : जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा महालगांव येथील पिडित श्रमिक शेतकरी श्री. श्यामु दुर्वास बुराडे वय ५० वर्षे यांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस !
बोगस बियाणे प्रकरणी दोषी कंपन्यांवर कारवाई करुन संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पिडीत श्रमिक शेतकरी श्री. श्याम दुर्वास बुराडे रा. महालगाव, पोष्ट कान्हळगाव , ता. मोहाडी जिल्हा भंडारा यांनी तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती मोहाडी, पोलीस स्टेशन मोहाडी, जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे़ .
पिडीत श्रमिक शेतकरी यांची शेत जमीन मौजा महालगांव ता. मोहाडी येथे गट क्रमांक २३८ क्षेत्र. १.६० हे. आर. शेत जमीन आहे. या शेतजमिनी मध्ये पीडित शेतकरी यांनी "अमर बीज भंडार ,कॉटन मार्केट नागपूर, येथून दिनांक ७ जून २०२४ रोजी १) सोयाबीन जे.एस.- ९५६० ( गोकूल ) ३० किग्रॅ. लॉट / बॅच १३७४२५ रुपये २१००, २)ग्राउंड नट किंग प्रमुख २० कि.गॅ. डब्ल्यू डब्ल्यू.के.बी.आर.जी.- २०२४- १००६- रुपये ३८०० ला घेतला. व त्याचा बिल क्रमांक एस. ०१४४३ प्रमाणे घेतले आहे.
सदर बियाणाची लागवड दिनांक २ जुलै २०२४ रोजी शेतात केले. मात्र बियाणे शेतात उगलेच नाही. सदर बियाणे हे बोगस प्रतीचे देण्यात आल्याने श्रमिक शेतकऱ्यांची फसवणूक केली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. तसेच या हंगामातील पिकांची वेळ निघून गेली. तसेच सदर बियांना करिता शेतात केलेली मशागत, बियाने , खत, माणसांची मजुरी इतर गोष्टीमुळे शेतकऱ्यावर आर्थिक मुद्दंड बसलेला आहे.
बोगस बियाण्यांच्या संदर्भात सोयाबीन पिकाचे बी अंकुरले नाही. या बातम्यांची दखल घेऊन सुमोटो जनहित याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारने याबाबत तात्काळ खुलासा करावा व कृषी संचालक आणि गुणनियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. खत विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात. हे बघून विक्रेत्यांच्या राज्य संघटनेच्या आदेशाप्रमाणे तीन दिवस या विक्रेत्यांनी राज्यभर बंद पाळला. आमचा यात दोष नाही, एवढ्या घडामोडी घडत असताना शेतकरी पेरणीच्या कामात गुंतला आहे. तक्रार दाखल करायला उशीर झाला तर कृषी खात्याने कृषी विद्यापीठाच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करायची शिफारस आहे. त्यामुळे आता मुदत संपली आहे. यापुढे तक्रारी दाखल करून घेऊ नका, असे निर्देश तालुका पातळीपर्यंत दिले आहेत. पेरणी केव्हा झाली याची शहानिशा करून त्याबाबत तक्रारी दाखल करून घेतल्या पाहिजेत, अशी मागणी श्रमिक शेतकरी श्यामु दुर्वास बुराडे यांनी केली आहे.
केंद्र सरकारचा बियाणे अधिनियम १९६६ त्यावरचे नियम, १९६८ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ या अंतर्गत काढलेले बी-बियाणे आदेश १९८३ यामध्ये बियाणे अंकुरित झाले नाही. तर भरपाई देण्याची तरतूदच नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे़. त्याचा गैरफायदा कंपन्या घेतात व कृषी खात्यानेही त्या त्रुटीकडे बोट दाखवले आहे.
मुळात हा फसवणुकीचा गुन्हा होऊ शकतो, असे श्रमिक शेतकरी यांचे म्हणणे आहे़. या संबंधात सोयाबीनच नव्हे, भुईमुंग , शिमला मिरची बियाणेही बोगसच आहे. बियाण्यांच्या बाबतीत सोयाबीनच्या बियाण्यांच्या सर्वाधिक तक्रारी आहेत़. तसेच भुईमूग, मिरचीचे बियाणे बोगस निघाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़. कंपन्यांवर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई भरून द्यावी अशी श्रमिक शेतकऱ्याची मागणी आहे.


0 टिप्पण्या