तसेच स्थानिक महिलांना नाहक त्रास देत आहे ...!
सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
उल्हासनगर- उल्हासनगर शहरात महानगर पालिका द्वारा प्रभाग समिती ४ मध्ये लाडकी बहीण योजना करीता ऑनलाईन फॉर्म भरून देत आहेत, सदर फॉर्म भरताना महिला वर्गाकडून कर्मचारी कागदपत्र मागून घेतात तसेच त्यांना आज या उद्या या फॉर्म मुख्य कार्यालय मध्ये गेला असे सांगून त्यांची दिशा भुल करून महिलांना फिरवत आहेत.
प्रभाग समिती ४ उल्हासनगर ५ येथील ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्या महिला कर्मचारी यांच्या वर कारवाई करावी ज्या ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी टाळाटाळ करत असून महिलांना फॉर्म भरण्या करता मदत केली जात नाही व महिलांना योजना पासून वंचित ठवण्याचे काम करत असल्याने त्या महिला कर्मचारी यांच्या वर कारवाई करण्या करिता तक्रार उपयुक्त साहेब, उल्हासनगर महानगर पालिका ,मा.सहायक आयुक्त साहेब,प्रभाग समिती ४. उ म पा.तसेच.प्रकल्प अधिकारी साहेब,एकात्मिक बालविकास प्रकल्प. यांना देण्यात आले आहे. संबंधित महिला अधिकार कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजसेवक ॲड प्रशांत चंदनशिव यांनी केली आहे


0 टिप्पण्या