सोमनाथ खंळागडे सोलापूर
सोलापूर :-कधीही एक महिन्यापेक्षा एका जागेवर न राहणाऱ्यांना सोबत घेऊन आलेले केंद्रातील सरकार अस्थिर असून तेथे कधीही आपल्या विचारांचे सरकार येऊ शकते त्यासाठी येत्या निवडणुकीत मविआचे सरकार निवडून आणा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढलेल्या 'शिव स्वराज्य यात्रे'चे अकलूज येथे भव्य स्वागत करण्यात आले. यानिमित्त अकलूज येथे झालेल्या सभेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खा. अमोल कोल्हे, खा. धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर, युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी सेल सुरेश गव्हाणे, उद्योग विभाग नागेश फाटे, सामाजिक विभाग पंडित कांबळे, मदनसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, संकल्प डोळस आदी मान्यवर उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटील यांनी घेतलेल्या निर्णयातून संपूर्ण महाराष्ट्रभर संदेश गेला. त्यांनी बदलाची सुरुवात केली. दहापैकी आठ उमेदवार निवडून आल्याने आज संसदेत विरोधी पक्ष भक्कम झाला. जनतेने निवडून दिलेले हे खासदार जनतेच्या विश्वासाला पात्र राहतील असेच काम संसदेत करीत असल्याचे आपण पाहिले आहे. विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यात आपण निवडून येणारच आहोत. परंतु सोलापूर जिल्ह्यातील सर्व उमेदवार निवडून येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. येत्या निवडणुका लक्षात घेऊन
हे सरकार अनेक फसव्या योजना जाहीर करीत आहे. कोणत्याही योजनेला विरोध नसून त्याचा उद्देश, हेतूबद्दल विरोध आहे योजनेच्या जाहिरातीसाठी २७९ कोटी तर योजना सांगण्यासाठी योजना दूतांवर ३०० कोटी खर्च केला जात आहे. आमचे सरकार आल्यावर या योजना योग्य विचाराने, अधिक चांगल्या पद्धतीने, ठामपणे राबवू अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.
यावेळी खा. अमोल कोल्हे म्हणाले, हे सरकार म्हणजे 'शोले'चे नवीन व्हर्जन असून सो जा वरणा ईडी, सीबीआय आयेगी असे धमकवीत राजकारण करणारे आहे. हे सरकार गाईवर बोलेल पण महागाईवर नाही, रामावर बोलेल पण हाताला काम देणार नाही, खोटे बोल पण रेटून बोलणारे हे सरकार योजनांचे आवाच्या सवा आकडेवारी सांगत आहे. कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क कमी करा यासाठी आंदोलन केले मात्र ते लोक सोशल मीडियावर कांद्याचे दर कमी करा यासाठी आंदोलन केले असल्याचा खोटा प्रचार करून दिशाभूल करीत आहेत. आता कोणताच मार्ग उरला नाही म्हणून ते जातीय तेड निर्माण करीत आहे तेव्हा आपण जागृत राहून लोकसभेच्या निवडणूक दिलेल्या निवडणुकीत दिलेल्या धक्क्यामुळे सरकार डळमळीत झाले असून सरकार आता अजून एक धक्का द्या म्हणजे ते पडेल महाराष्ट्र सत्ता बदल झाल्या देशातही बदल घडेल.
यावेळी खासदार मोहिते धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेच्या अधिवेशनातील पंतप्रधानांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील दिलेल्या भाषणात फक्त विरोधी पक्षावर टीका करीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याचे टाळले असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठही खासदारांनी विविध प्रश्नांबाबत या अधिवेशनात आवाज उठविल्याचे सांगितले.
माळशिरस विधानसभा उत्तमराव जानकर?
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात तुम्ही चारशे टक्के निवडून याल परंतु बाहेर राज्यातही फिरा असे सांगत सांगितले. तर जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेला शब्द अंतिम असतो हे माहीत असून सुद्धा काही जण शंका उपस्थित करत असतात त्या उपस्थित करू नये असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगत उत्तम जानकर यांच्या उमेदवारीला दुजोरा दिला.


0 टिप्पण्या