सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
ठाणे :-नारायणगांव येथील हलगीसम्राट केरबा पाटील संस्था ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास प्रतिष्ठान व ग्रामपंचायत वारूळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने *लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे* यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.यामध्ये *मा.श्री.प्राचार्य पांडुरंग गायकवाड ,मा.श्री.शिवाजी राजगुरू (उपाध्यक्ष,आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे शासकीय स्मारक समिती),मा.श्री.राजेंद्रभाऊ मेहेर (सरपंच,वारूळवाडी ग्रामपंचायत), मा.श्री.दिपकभाऊ बाळसराफ (सरपंच,सावरगांव ग्रामपंचायत), मा.श्री.दातखिळे साहेब (सरपंच,दातखिळेवाडी ग्रामपंचायत), मा.श्री.भावेश डोंगरे (सरपंच,आर्वी ग्रामपंचायत),मा.श्री.जुबेर शेख (अध्यक्ष, राजे पतसंस्था),मा.श्री.संतोषभाऊ डोके (तालुकाध्यक्ष,शिवसेना आंबेगाव तालुका), मा.मिनाक्षीताई खरात (उपाध्यक्ष,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी फाऊंडेशन), प्रसिद्ध बैलगाडामालक मा.श्री.एकनाथशेठ कसबे, मा.श्री.बाबाजी कोरडे सर(तज्ञ तमाशा अभ्यासक), मा.श्री.दादाभाऊ आल्हाट (सेवानिवृत्त मुख्याध्यापक),मा.श्री.वसंतराव लोंढे (सेवानिवृत्त वनाधिकारी),मा.श्री.काशिनाथ आल्हाट सर(संस्थापक/अध्यक्ष,हलगीसम्राट केरबा पाटील फाऊंडेशन)* आदी मान्यवरांच्या उपस्थितीत *साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन* करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या निमित्ताने *शाहीर ठकसेन शिंदे* यांच्या शाहिरी गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी *प्रसिद्ध गायिका व लावणीसम्राज्ञी सौ.सीमा पोटे, प्रसिद्ध गायिका व तमाशासम्राज्ञी रेणुका खुडे, प्रसिद्ध गायिका सौ.गायत्री शेलार, प्रसिद्ध गायिका सौ.अनुराधा खंडे, प्रसिद्ध गायिका सौ.शारदा गावडे, प्रसिद्ध गायिका व तमाशासम्राज्ञी सौ.नंदा भोकटे, प्रसिद्ध गायिका व लावणीसम्राज्ञी मिराबाई दळवी* आदी कलाकारांनी अण्णाभाऊंच्या जीवनावरील गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.यावेळी *मा.श्री.किरणकुमार ढवळपुरीकर (उपाध्यक्ष,अखिल भारतीय तमाशा परिषद), विनोदसम्राट मा.श्री.सुधाकर पोटे, प्रसिद्ध गायक मा.श्री.संजय फल्ले,प्रसिद्ध गायक व तमाशासम्राट मा.श्री.कैलास सावंत नारायणगावकर, तमाशासम्राट मा.श्री.महादेव खुडे नारायणगावकर, प्रसिद्ध गायक व तमाशासम्राट मा.श्री.राजेश सावंत नारायणगावकर, प्रसिद्ध ढोलकीसम्राट मा.श्री.शैलेश भंडारे,तमाशासम्राट मा.श्री.संजय महाडिक, प्रसिद्ध वादक निलेश भंडारे, प्रसिद्ध वादक भालचंद्र पोटे आदी गुणवंत कलावंत उपस्थित होते.तसेच प्रसिद्ध ढोलकीसम्राट पमाजी पंचरास लोणीकर व वाजंत्री ताफा, प्रसिद्ध सनईसम्राट मा.श्री.दादाभाऊ आल्हाट घोडेगावकर व वाजंत्री ताफा* या वादन संचांनी पारंपारिक वादन करून आण्णाभाऊंना अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते *मा.श्री.प्राचार्य पांडुरंग गायकवाड* यांनी आपल्या अस्खलित व ओघवत्या वाणीने आण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर व्याख्यान देत उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने *मा.श्री.नवनाथशेठ भागवत(नवउद्योजक पुरस्कार),मा.श्री.अमोल अंकुश(सामाजिक योगदान पुरस्कार),मा.श्री.नरेश पंचरास(सनई सम्राट पुरस्कार),मा.श्री.शाहीर ठकसेन शिंदे(शाहिरी पुरस्कार),मा.श्री.दादाभाऊ आल्हाट(सनई सम्राट पुरस्कार),मा.सौ.गायत्री शेलार(गुणवंत गायिका पुरस्कार),मा.धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्था (आदर्श नागरी पतसंस्था पुरस्कार),मा.श्री.नंदकुमार नेटके(उत्कृष्ट गायक पुरस्कार),मा.श्री.रामदास भोईर(उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार),मा.श्री.राजेंद्रभाऊ मेहेर(आदर्श सरपंच पुरस्कार),मा.सौ.अनिता शिंदे(आदर्श शिक्षणाधिकारी),मा.श्री.कैलास सावंत नारायणगावकर(गुणवंत तमाशा कलावंत पुरस्कार),मा.श्री.जनार्दन वायदंडे(ढोलकीसम्राट पुरस्कार),मा.श्री.शकिलभाई मणियार(आदर्श पत्रकारिता पुरस्कार),मा.श्री.भगवान काशीद(आदर्श शिक्षक पुरस्कार),मा.श्री.शांताराम डोंगरे(आदर्श शिक्षक पुरस्कार),मा.सौ.पुनम हांडे(आदर्श शिक्षक पुरस्कार),मा.श्री.विष्णू धोंगडे(आदर्श अधिकारी पुरस्कार),मा.श्री.आशिष दुर्गे(सामाजिक योगदान पुरस्कार)* आदी मान्यवरांना *अण्णाभाऊ साठे पुरस्कार* देवून सन्मानित करण्यात आले.त्यानंतर उपस्थित तमाम महिलांना भेट म्हणून साडी वितरण करण्यात आली.तद्नंतर चविष्ट भोजन सभारंभाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ कलावंत शाहीर मा.श्री.लक्ष्मण लोखंडे पारुंडेकर, हलगीसम्राट मा.श्री.एकनाथ आल्हाट,मा.श्री.सुनील आल्हाट, मा.श्री.महादेव खुडे, मा.श्री.मनोहर वायकर सर,मा.श्री.मेहबूब काझी सर,मा.श्री.थोरात सर,मा.श्री.अनिल शिंदे,मा.श्री.अनिल खुडे,मा.श्री.विशाल शेलार,मा.श्री.सचिन लोखंडे,मा.श्री.राजकुमार भालेराव सर,मा.श्री.संतोष पंचरास आदी समाजबांधव उपस्थित होते.यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक मा.श्री.साईनाथ कनिंगध्वज सर व आभार मा.श्री.अमित आल्हाट यांनी केले.


0 टिप्पण्या