Ticker

6/recent/ticker-posts

प्रभू श्रीराम स्थापित हंडरगुळीचे शिवालय भक्तांनी गजबजले .....


विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :- वनवास भोगत असताना प्रभू श्रीराम हे येथे असता तिरु नदी पाञात स्नान केले व नदीपाञातील वाळू द्वारे नदी किनारी महादेवाची पींड तयार करुन तिचे दर्शन घेतले तेंव्हा पासुन याच जागेत महादेवाचे मंदीर अस्तित्वात आले आहे.अशी एक अख्याईका आहे.आणी याच मंदीरात श्रावणात हाळी व परिसरातील गावातील स्ञी, पुरुष भक्त मंडळी हजारोंच्या संख्येत दर्शनासाठी पहाटे पासुन गर्दी करीत असल्याने प्रभू श्रीराम स्थापित येथे असलेले शिवालय (महादेव मंदीर) भक्तांनी श्रावणातील चौथ्या सोमवारी गजबजले होते.
संतबंधू जळोजी-मळोजी महाराज यांची जन्म भुमी तसेच प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन व त्यांचे हस्ते स्थापित असलेले हंडरगुळीचे महादेव मंदीर हे भक्तांचे श्रध्दास्थान व नवसाला पावणारे आहे.म्हणुन या शिव मंदीरात सालाचे 12 महिने स्ञी पुरुष भक्तांची वर्दळ असते.श्रावण महिण्यात येथे येणा-या हजारो स्ञी भक्त मंडळींची दर्शनासाठी वेगवेगळी रांग असते.तसेच मंदीर कमिटी तर्फे तसेच दानशुरांतर्फे श्रावण सोमवारी मसाला दूध व फळ वाटप करतात. व मंदीरापुढे पेल,फुल,श्रीफळ,अगरबती विक्रीचे स्टाॅल विक्रेते लावतात.हाळी सह दुरदुरच्या गावातील भक्त मंडळी दर्शनासाठी तसेच नवस बोलण्यास व बोललेले फेडण्यास येतात.
प्रभू श्रीरामचंद्र स्थापित हंडरगुळीचे शिवालय {महादेव मंदीर} स्ञी,पुरुष व बच्चेकंपनी या भक्तांच्या गर्दीमुळे गजबजलेले असते.तसेच दर सोमवार राञी 7 वा.हजारो भक्तांच्या साक्षीने महाआरती संपन्न होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या