• राजेगाव(एमआयडीसी) बसस्थानक जवळील घटना
• ७ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- प्राण्यांना निर्दयतेने वागविने व कत्तल करण्याच्या उद्देशाने विना परवाना वाहतूक केल्यास कठोर कायदे अस्तित्वात असले तरी यास बगल देऊन ३१ गोवंशांना पायाला दोराने बांधून पिडादायक रित्या भरगच्च कोंबून टाटा ९०९ व्दारे वाहतूक केल्याची घटना सोमवार(ता.१९ ऑगस्ट) पहाटे ३:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. लाखनी पोलिसांनी टाटा ९०९ सह ३१ जनावरे किंमत ७ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ट्रक चालक व मालकावर गुन्हा दखल केला असून पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.
टाटा ९०९ ट्रक क्रमांक एमएच ०४ एफजे ७२३२ ने कत्तलखान्यात जनावरे नेण्यात येत असल्याच्या गुप्त माहिती वरून पोलिस पथक राष्ट्रीय महामार्ग ५३(जुना ६) ने पेट्रोलिंग करीत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा ९०९ कंपनीच्या ट्रॅक ला राजेगाव(एमआयडीसी) बस स्थानकाजवळ थांबवून झडती घेतली असता त्यात ३१ जनावरे व त्यापैकी १ मृत दाटीवाटीने व पिडादायक रित्या दोराने बांधून निर्दयतेने वागणूक देऊन जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहनामध्ये कोंबून विना पास परवाना वाहतूक करतांना मिळून आल्याने टाटा ९०९ ६ लाख व गोवंश १ लाख ३० हजार असा एकूण ७ लाख ३० हजाराचा मुद्देमाल अवैध रित्या मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करून पोलिस शिपाई नितेश घोनमोडे यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी ट्रक चालक व मालकावर अपराध क्रमांक ३०४/२०२४ अन्वये गुन्हा दाखल केला असून कलम ३५२, ३(५) भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २००५(सुधारित कायदा २०१५) चे सहकलम ५(अ)(ब), ९, प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबद अधिनियम १९६० चे सहकलम ११(१)(ड), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे सहकलम ११९ अन्वये ट्रक चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार दिगंबर तलमले तपास करीत आहेत.
0 टिप्पण्या