Ticker

6/recent/ticker-posts

शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

आम आदमी पार्टीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन 

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून सोमवार(ता.२६ ऑगस्ट) रोजी खात रोडवर ३ जनावरांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अशा घटना टाळण्यासाठी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. या करिता आम आदमी पार्टी भंडारा चे वतीने मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा यांना निवेदन देण्यात आले आहे. मुख्याधिकारी काय भूमिका घेतात. याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे. 
                      शहरातून जाणाऱ्या व शहरातील अनेक रस्त्यावर मोकाट जनावरे बसतात. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात असे समीकरण ठरलेले आहे. या प्रकाराने अनेकांना इजा झाली असून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. तर जनावरांनाही मार लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या मोकाट जनावरांमुळे शहरवासियांना अकारण त्रास सहन करावा लागतो. जनतेची समस्या लक्षात घेऊन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून शहरवासियांना होणारा त्रास टाळण्याकरिता आम आदमी पार्टी भंडारा चे वतीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. या करिता मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा यांना निवेदन देण्यात आले आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास आम आदमी पार्टीचे वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अतुल लोणारे, हेमंत गजभिये, सूरज मदनकर, कामेश लेंडे, धम्मदीप चव्हाण, रुपेश सोनटक्के, दुर्गेश रोडगे इत्यादी पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या