कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- विदर्भ शाहीर कलाकार परिषद कान्हण शाखा भंडारा तथा स्वर्गीय सुलोचना पारधीकर बहुद्देशीय संस्था मासलमेटा तालुका लाखनी च्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व स्वर्गीय धर्मदास भिवगडे यांचे पुण्यतिथी निमित्त २८ व २९ ऑगस्ट २०२४ रोज बुधवार व गुरुवार ला संताजी मंगल कार्यालय लाखोरी रोड लाखनी येथे विदर्भस्तरीय सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिप प्रज्वलन वैनगंगा बहुद्देशीय शिक्षण संस्था साकोली चे अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, उदघाटक माजी आमदार बाळा काशीवार, सहउदघाटक भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, अध्यक्षस्थानी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. मनिप भिवगडे, विशेष अतिथी केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभूर्णे, भाजपा प्रांत सदस्या रेखा भाजीपाले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवराम गिरेपुंजे, भाजपा तालुकाध्यक्ष श्रावण कापगते, विशेष पाहुणे भाजपा किसान आघाडी अध्यक्ष हरींद्र राहांगडाले, जिल्हा परिषद सदस्या सूर्मिला पटले, जि.प. सदस्या महेश्वरी नेवारे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष घनश्याम खेडीकर, उपसभापती गिरीश बावनकुळे, सामाजिक कार्यकर्ता अशोक पटले, नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर, स्वामी कन्स्ट्रक्शन चे रामेश्वर बिसेन, प्रमुख अतिथी बाजार समिती संचालक उमराव आठोळे, रामकृष्ण वाढई, महेश पटले, प्रेमकुमार गहाने, जयहिंद राइस मिल चे मोहसिन आकबानी, साईबाबा राइस मिल चे सारंग खेडीकर, इंजि. प्रदीप राहांगडाले, दिनेश येळेकर, जीवन लंजे, मनोज पटले, अतुल भांडारकर, वसंता कुंभरे, मिलिंद खोब्रागडे, चुडानंद लांजेवार, धनपाल बोपचे, लाखोरी चे सरपंच सुधीर चेटूले, मासलमेटा च्या सरपंच आचल फेंडर, सालेभाटा चे सरपंच खूमेश बोपचे, राजेगाव चे सरपंच नरेंद्र रामटेके, उपसरपंच नरेश ठाकरे, मोरगाव चे उपसरपंच मनोहर पटले, गूढरी चे सरपंच मंगलमूर्ती रामटेके, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या विदर्भस्तरीय सांस्कृतिक कला महोत्सवात विदर्भातील नाटक, तमाशा, नौटंकी, गोंधळ, भारुड, कला पथक, दंडार, कीर्तन, भजन, डहाका, गायन, वादन, नृत्य, शाहिरी, नक्कल, पोवाडा, जत्यावरचे गाणे, रोवणीचे गाणे, विविध सांस्कृतिक क्षेत्रातील पुरुष, महिला, बाल कलाकारांचा द्वी दिवसीय भव्य मेळावा होणार आहे. यात पत्रकार दिलीप बडोले, चंदन मोटघरे, कालिदास खोब्रागडे, डी.जी. रंगारी, श्यामसुन्दर उके, अंगेश बेहलपाडे, मदन कमाने, रवी धोतरे यांचेसह तिर्थानंद बोरकर व संच एकोडी, नेमीचंद फंदे व संच सोमलवाडा, अभय सार्वे व चेतन बडोले संच लाखनी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या विदर्भस्तरीय सांस्कृतिक कला महोत्सवाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. रामनाथ पारधीकर, उपाध्यक्ष आशिक राहूले, अशोक हुमने, भास्कर कमाने, नामदेव निंबार्ते, जगदीश देव्हारे, पतीराम पुंडे, सुधीर लांजेवार, प्रेमदास गोटेफोडे, दमोधर मेहर, खुलेश्वर चवळे, खुशाल कोसरे, ज्योती वाघाये, देवांगना पटले, स्मिता बीसेन, अर्चना पुंडे, उत्तर निंबार्ते, लोटन पटले, प्रभाकर लिचडे, रघुनाथ कावळे, राजकुमार मेश्राम, जगदीश लांजेवार, कंठीलाल बिसेन, उदाराम येळे, साहेबराव टेंभरे आणि मंडळाने केले आहे.


0 टिप्पण्या