कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- लाखनी तालुक्यातील चूलबंद नदी काठावर असलेल्या सोनमाळा येथे पावसाळ्यात नेहमीच सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विशेषतः शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना त्रास होतो. सापाविषयी ग्रामीण परिसरात काही गैरसमजुतीमुळे साप दिसताच यमसदनी पाठविले जाते. साप हा शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे. असे सोनमाळा येथील शेतकऱ्यांवर डॉ. मोटघरे मुरमाडी/तूप यांनी बिंबविले व गावात अथवा शेतशिवारात एखादा साप दिसल्यास त्याला पकडा, पकडण्यास योग्य बक्षीस दिले जाईल असेही सांगितले. रविवार(ता.१५ सप्टेंबर) रोजी हरीदास रामटेके यांचे शेतशिवारात अजगर साप असल्याचे दिसून आले. या बाबद गावात माहिती होताच अजगर सापाला पाहण्यासाठी गर्दी जमा झाली. या गर्दीतीलच दीपक तरोने, डिकेश्वर बागळे, महेश कान्हेकर रा. सोनमाळा या युवकांनी साप पकडण्याचे कसलेही प्रशिक्षण नसतांना सापाला पकडले व डॉ. मोटघरे यांना माहिती दिली. डॉ. मोटघरे यांनी मुरमाडी/तूप बीटाच्या वनरक्षक रंगारी मॅडम यांना सूचना करून अजगर साप त्यांचे सुपूर्द केले. अजगर सापाला वनरक्षक रंगारी मॅडम यांनी निसर्गाच्या सानिध्यात सोडल्याने अजगर सापाला जीवदान मिळाले.


0 टिप्पण्या