Ticker

6/recent/ticker-posts

विविध हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


• सम्यक फाऊंडेशन साकोलीचा उपक्रम 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सम्यक फाऊंडेशन साकोलीच्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, विभागीय मंडळ नागपूर अंतर्गत घेतलेल्या मार्च २०२४ मधील दहावी व बारावीच्या परीक्षेत विविध हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे यश संपादन करणाऱ्या साकोली येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय देवगिरकर होते. विशेष अतिथी म्हणून साकोली येथील पोलीस निरीक्षक संजय गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक भाषण डॉ. शंकर बागडे यांनी केले. यावेळी प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. सी. जे. खुणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष अतिथी पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी समयोचित भाषण करून सत्कारपात्र गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयात व क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन करिअर करावे. यशस्वी होण्यासाठी चांगला अभ्यास करा. मोबाईलचा सदुपयोग करा. फेसबुकचा दुरुपयोग करू नये .आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे असा मोलाचा संदेश पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिला. 
                 या समारंभात बारावी विज्ञान शाखेतील हिमांशी अंबुले, अंजली चांदेवार, द्रोणाचार्य लांजेवार, हिमांशू सुरसाऊत, उत्कर्षा मेश्राम, नेहा मस्के, आर्या घावले, मयुरी गहाणे, बारावी कला शाखेतील काजल गोंधळे, गायत्री बहेकार, नेहा लोथे, शालिनी डोंगरवार, मेहुल टेंभरे, भारती मांधारे, बारावी वाणिज्य शाखेतील भाग्यश्वर लांजेवार, अश्विनी लांजेवार, दहावीतील रितीशा नंदेश्वर, पूर्वा बोरकर, धनश्री खरकाटे, मयूर गहाणे, शौर्य बैस, आर्या गायधने, पियुष गहाणे, श्रीकांत संग्रामे, खुशबू गोटेफोडे, प्रियंका हटकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभातील मान्यवर अतिथींच्या हस्ते पारितोषिक, गौरवपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. 
                  या समारंभाच्या यशस्वीतेसाठी आर्थिक योगदान डॉ. शंकर बागडे, प्राचार्य डॉ. सी. जे. खुणे,  प्रा. डाॅ. प्रेमानंद मेश्राम, प्रा. प्रज्ञासूर्य रामटेके, प्रा. ज्वाला घायाळे, प्रा. विलास हलमारे, प्रा. संजय रोकडे, प्रा. संजय डोंगरे, प्रा. डी. ए. गहाणे, प्रा. ज्योती कानेकर, प्रा. विलास शिवणकर, प्रा. डॉ. दिपक साखरे, प्रा. नरेश बारबुद्धे, प्रा. प्रमोद लांजेवार, प्रा. नाजूक दिघोरे, प्रा. संजय पडोळे, प्रा. दिशांत रंगारी, प्रा. मोसमी बागडे,  श्री. उत्तम मेश्राम यांनी दिले. या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. विलास हलमारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत शिवनकर यांनी केले. या समारंभाच्या यशस्वीतेसाठी कृष्णमुरारी कटकवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साकोली येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या