Ticker

6/recent/ticker-posts

अवैध रेती वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली पकडली

• एसडीपीओ पथक भंडारा ची कारवाई 

• ५ लाख ५ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- वरठी पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध रेती वाहतूकिवर कारवाई करण्याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी भंडारा चे पथक पट्रोलिंग करीत असताना स्वराज कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर दाभा/फाटा येथे विना परवाना अवैध रेतीची वाहतूक करतांना मंगळवार(ता. २४ सप्टेंबर) चे पहाटे ४:०० वाजता मिळून आल्याने ट्रॅक्टर चालक व मालकावर वरठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ लाख ५ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी ट्रॅक्टर चालकाचे नाव मुकंदर भाऊराव भोयर(३३) रा. टाकळी(पुनर्वसन), ट्रॅक्टर मालक सतीश भोयर रा. खमाटा असे आहे. 
                       जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्याकरिता सर्वच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात विशेष पथक तयार करून अवैध दारू विक्री, रेती तस्करी, अवैध सट्टा, चोऱ्या, गोतस्करी रोकथाम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या करिता उपविभागीय पोलिस अधिकारी भंडारा चे पथकातील सहाय्यक फौजदार चंदू भेंडारकर, पोलिस हवालदार सुभाष राठोड, साजन वाघमारे, राजेश टेंभूर्णे, पोलिस अंमलदार वैभव काळे, विजय राघोर्ते, रोहन काळे हे वरठी पोलिस ठाण्याचे हद्दीत रात्रीचे सुमारास पेट्रोलिंग करीत असताना दाभा फाट्यावर स्वराज कंपनीचा विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉली ने मालक सतीश भोयर यांचे सांगण्यावरून चालक मुकंदर भोयर याने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये विना परवाना १ ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आल्याने पंचासमक्ष कारवाई करून ट्रॅक्टर ट्रॉली किंमत ५ लाख व १ ब्रास रेती ५ हजार ५०० रुपये असा एकूण ५ लाख ५ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलिस ठाणे वरठी येथे अपराध क्रमांक १८९/२०२४ कलम ३०३(२), ४९ भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम(गौण खनिज) सहकलम ४८(८), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे सहकलम ७, ९ आणि मोटारवाहन कायदा सहकलम ५०/१७७, १३९/१७७ नुसार ट्रॅक्टर चालक मुकंदर भोयर व मालक सतीश भोयर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रेती सह ट्रॅक्टर पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिस ठाणे वरठी येथे ताब्यात दिल्याने आरोपी ट्रॅक्टर चालक व मालकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या