विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-2 व 4 चाकी वाहणांना फॅन्सी नंबर प्लेट बसविणे हे कायद्याने गुन्हा आहे.अण् अशा नंबरच्या वाहणधारकांवर शहरात व महानगरात दंडात्मक कारवाई होत असते.माञ पो.स्टे.व पो.चौकी जिथे आहे.त्या गाव,खेड्यामध्ये अजुन पर्यंत एकाही फॅन्सी नंबरच्या गाडीवर कसलीच कारवाई केली नसल्याने 4141 दादा 4147 दादी तसेच राम 214 व शाम असे नावांचे फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या गाड्या बिनधास्तपणे धावतात.म्हणुन अशा नंबरच्या गाड्यांवर कारवाई करणार कोण?असा प्रश्न सामान्य जनता विचारीत आहे . फॅन्सी नंबरमुळे एखाद्या गुन्ह्यातील गाडी व गुन्ह्याचा तपास करणे सं- पोलीसांना जड जाऊ शकते.म्हणुन अशा दादा,भाई नंबरवाल्या वाहणांवर दंड वा इतर रितसर कारवाई फक्त शहर व महानगरातच केली जाते.माञ हळी व हंडरगुळी,वाढवणा या सारख्या पो. चौकी व ठाणे असलेल्या ग्रामीण खेडे गावात कारवाही होत नाही . का,कारवाई करु नका ! असे वरिष्ठ अधिका-यांचे आदेश आहेत.का ? व ते नसतील तर मग आज अनेक फॅन्सी नंबरचे वाहणे धावतात.तरीही अजुन पर्यंत कुणीही का कारवाई केली नाही . लहाण-मोठ्या अशा सगळ्या गाड्यांना प्रादेशिक परिवहन विभागाकडून विहीत नमुण्यात नंबर टाकुन ते प्लेट वाहणधारकांना दिले जातात.आणि असे नंबर अपघातावेळी व इतरवेळी ओळखणे सोपे जाते.माञ अनेकजण आरटीओ कार्यालयाकडून आलेल्या नंबर प्लेट्स मध्ये आपापल्या आवडी प्रमाणे बदल करतात.तो कायद्याने गुन्हा असुनही 4141 नं.ला दादा व 4147 नं.दादी तसेच 214 नं.ला राम-शाम असे नाव नंबर प्लेट्सवर टाकतात.म्हणुन गुन्ह्याचा तपास करताना अडथळे येऊ शकतात.तसेच अशा नंबरच्या वाहणांचा अपघात झाला.व नंबर अस्पष्ट व फॅन्सी असेल तर विम्याचे क्लेम दाखल करण्यातही अडचण येऊ शकते.तेंव्हा आरटीओ द्वारा दिलेले नंबर प्लेट्स लावावेत.हे शासनादेश असुनही फॅन्सी नंबरच्या गाड्या सुसाट पळतात.व या गाड्या मालकीच्या का चोरीच्या ?याचाही शोध घेणे गरजेचे आहे.कारण मोठे व्यापारी व जमीनदार यांचेकडे नाहीत पण ज्यांच्याकडे पसाभर शेती नाही. व मोठा व्यापार नाही.तरीही अशा कांही लोकांकडे लाखो रु.च्या 8—8 दिवसाला नवनविन माॅडेलच्या महागड्या बाईक्स,गाड्या येतात कशा ? व कोठून ? आणी अशा नंबर नसलेल्यांसह फॅन्सी नंबरच्या गाड्यांवर कारवाई करणार कोण ? RTO का अन्य कुणी ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या