Ticker

6/recent/ticker-posts

पावसामुळे निसवा झालेल्या धानाचे नुकसानीची शक्यता

• २ दिवसापासून वाऱ्यासह पाऊस

• धान उत्पादक शेतकरी चिंतातुर

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यात हजारो हेक्टर कोरडवाहू धान शेती पावसाचे पाण्यावर अवलंबून असल्यामुळे अनेक शेतकरी ९० ते ११० दिवसात निघणाऱ्या धानाच्या हलक्या प्रजातीची लागवड करतात. या हलक्या धानाचा निसवा होऊन काही धान परिपक्व झाले असले तरी नियमित पाऊस येत असल्यामुळे हलक्या धानाचे नुकसानीची शक्यता वर्तविण्यात येत असून या प्रकाराने शेतकरी हाती आलेला घास जाणार या भीतीने धास्तावला आहे.
             लाखनी तालुक्यात मोठा वा मध्यम सिंचन प्रकल्प नसल्यामुळे सिंचनाच्या सोयी मर्यादित असल्यामुळे हजारो हेक्टर कोरडवाहू शेतजमीन पावसाचे पाण्यावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे सरासरी इतका पाऊस होत नाही. त्यामुळे शेतकरी ९० ते ११० दिवसांत निघणाऱ्या बाहुबली, १०१०, सिंधू, आयआर ६४, आयआर ३६, दत्तरी या सारख्या धानाची लागवड करण्यात येते. तसेच धान्य व्यापारी हमीभावापेक्षा कमी किमतीने धान्य खरेदी करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्यामुळे शेतकरी हलक्या प्रजातीचे ठोकळ धानाची लागवड करून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री करणे पसंत करतात. खरीप हंगाम २०२४ मध्ये मृग नक्षत्राचे शेवटी, आद्रा नक्षत्राचे सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांची पेरणी आटोपली होती. हलक्या प्रजातीच्या धानाचे लागवडीस ३ महिने पूर्ण झाल्यामुळे लागवड करण्यात आलेल्या धानाचा निसवा झाला असून धान परिपक्व झालेले आहेत. पण सप्टेंबर चे सुरुवातीलाच ४ दिवस त्या नंतर दुसऱ्या आठवड्यात ३ दिवस तसेच २२, २३, २४ सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पाऊस झाल्याने हलक्या प्रजातीचे परिपक्व झालेले धान शेतात पडून नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतातुर झाला आहे.  
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)*
खरीप हंगाम २०२४ मध्ये धानास पोषक अशी पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे हलक्या प्रतीचे धान परिपक्व झाले आहे. पण पावसामुळे कापणी करता येत नाही. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. 
*रवींद्र उपरिकर, प्रगतिशील शेतकरी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या