Ticker

6/recent/ticker-posts

क्षुल्लक कारणावरून मारहाण, युवक जखमी

केसलवाडा/वाघ येथील घटना 

युवकासह विधी संघर्षित बालकावर गुन्हा दाखल 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- माझे भावासोबत भांडण कशाला करतोस असे बोलून शिवीगाळ करून काठीने डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना मंगळवार(ता.२४ सप्टेंबर) रोजी सकाळी ७:०० वाजता दरम्यान केसलवाडा/वाघ येथे घडली. जखमी चे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी १९ वर्षीय युवक व १७ वर्षीय विधी संघर्षित बालकावर गुन्हा दाखल केला आहे. जखमी युवकाचे नाव निलेश भागवत उके(२६) रा. केसलवाडा/वाघ तर आरोपीचे नाव हर्षल गणेश कमाने(१९) रा. केसलवाड/वाघ, तालुका लाखनी असे आहे. पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत. 
                   जखमी युवकाचे केसलवाडा/वाघ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ हेअर कटिंग सलून चे दुकान असून मंगळवार सकाळी ७:०० वाजता दरम्यान निलेश उके हा आपले सलून चे दुकान उघडत असताना दिनेश घोनमोडे व अनिकेत कमाने हजार असून २२ सप्टेंबर च्या झगड्याबाबद वार्तालाप सुरू होता. तेव्हा विधी संघर्षित बालक काठी घेऊन आला व त्याने निलेश उके याला तु जास्त शहाणपणा करतोस का. तू धानाचे पोते चोरालास असे बोलून शिवीगाळ केली व झगडा भांडण करीत असताना हर्षल कमाने याने विधी संघर्षित बालकाला फोन करून बोलवल्याने तो काठी घेऊन आला व माझ्या भावासोबत कशाला भांडण करतेस असे बोलून शिवीगाळ करीत होता. विधी संघर्षित बालकाने मागेहून येऊन फिर्यादी निलेश उके याचे डोक्यावर मारून जखमी केले व हर्षल कमाने याने मिळून शिवीगाळ केली. तसेच जीवाने मारण्या पिटण्याची धमकी दिली. असे जखमी चे फिर्यादी वरून तसेच वैद्यकिय अहवालावरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ३७३/२०२४ कलम ११८(२), ३५३, ३५१(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये हर्षल कमाने व विधी संघर्षित बालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या