Ticker

6/recent/ticker-posts

एकीकरणासाठी संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ ची स्थापना

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा :- गटातटात विखुरलेल्या रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना एकत्र आणण्याकरिता संयुक्त रिपब्लिक आघाडी नागपूर व एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा चे वतीने रविवार(ता.१५ सप्टेंबर) रोजी अध्यापक भवन नागपूर येथे संयुक्त बैठक घेऊन या समित्यांचे एकत्रीकरण करून संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ असे नामकरण करण्यात आले. येत्या विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपूर आणि भंडारा या २ विधानसभा क्षेत्रात उमेदवार देण्याचे ठरविण्यात आले. 
                    संयुक्त रिपब्लिकन आघाडी व एकिकृत रिपब्लिकन समिती भंडारा चे वतीने अध्यापक भवन येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आयु. दुर्वास चौधरी होते. यात रिपब्लिकन नेते जे गटबाजीत विभागले गेले आहेत. त्या सर्व रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणणे तथा आंबेडकरी समुदायातील कार्यरत विविध संघटनांचे एकत्रीकरण करून समाजाचे एकत्रित संघटन करणे असा प्रामाणिक विचार होता. या प्रकाराने समाजाचे प्रभावी नेतृत्व उभे करणे, नेत्याशिवाय या संकल्पनेला पुढे आणण्याचा प्रयत्न होता. भंडारा व नागपूर जिल्ह्यात एकाच उद्देशाने ज्या २ समित्या कार्यरत आहेत. त्या गोठवून "संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ" असे नामकरण करण्यात आले. इच्छुक उमेदवारांची विधानसभेकरिता चाचपणी करण्यात येईल. उत्तर नागपूर व भंडारा विधानसभा क्षेत्रात उमेदवार देण्याचा संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ चा विचार असून इच्छुकांची चाचपणी कोअर कमिटीच्या माध्यमातून त्यावर विचार होईल. असे बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभूर्णे, सूत्र संचालन डॉ. सुरेश खोब्रागडे तर आभार कैलास बोंबार्डे यांनी मानले. या सभेला प्रा. प्रदीप बोरकर, सहदेव गोडबोले, ओमप्रकाश सोनकुसरे, दिनेश डोके, सुनील इलमकर, दिलीप लांडगे, दिनेश गोडघाटे, दुर्वास चौधरी, रेश्मा भोयर, पद्माकर गणवीर, गीता कवाडे, मनीष गाणार, हिरालाल मेश्राम, अमृत बनसोड, रोशन जांभूळकर, दिलीप वानखेडे, संजीव भांबोरे, राजेश मडामे आणि बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या