Ticker

6/recent/ticker-posts

लाखनीत तंबाखूमुक्त अभियान कार्यशाळा

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- सलाम फाउंडेशन मुंबई तथा शिक्षण व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नुकतीच लाखनी तालुकास्तरीय तंबाखूमुक्त कार्यशाळा जि. प. गांधी विद्यालय लाखनी येथे संपन्न झाली.
                 कार्यशाळेला संबोधित करतांना शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर झोडे म्हणाले की, कोरोनापेक्षाही महाभयंकर रोगाचे कारण तंबाखू असून यावर प्रतिबंधात्मक उपाय वेळीच झाले पाहिजेत. आपण वेळीच सावध झालो नाही तर भविष्यात आपल्याला फार मोठ्या रोगाचा सामना करावा लागेल.  त्यासाठी त्याची सुरुवात शाळेतूनच करायला हवी. यावेळी तालुक्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त शाळा करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यशाळेत तंबाखूचे दुष्परिणाम आणि त्याचे मुलांवर होणारे दुष्परिणाम यावर सविस्तर माहिती दिली गेली. तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठीचे नऊ निकष सविस्तर समजावून देण्यात आले. या कार्यशाळेला प्राथमिक व माध्यमिक शाळेतील प्रत्येकी एक शिक्षक उपस्थित होते. यावेळी पुरुषोत्तम झोडे उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पालिकचंद बिसने, चेतन भुळे, धनंजय टेकाम, क्रांतीलाल पटले यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्रातील कारेमोरे, उज्वला गजभिये यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या