Ticker

6/recent/ticker-posts

सदर बाजार पोलीस ठाणे येथे खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

पत्रकाराच्या कथित गैरवर्तणुकीमुळे रक्तदान शिबिरे आणि ब्लड बँक पदाधिकारी त्रस्त

चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर: सदर बाजार पोलीस ठाण्यात खंडणी मागणीच्या प्रकरणी एका पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक ८३५/२०२४, भारतीय दंड संहिता कलम ३०८(३), ३५१(२), ३५२ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मसपोनि केंद्रे करीत आहेत.

फिर्यादी वैभव अशोक राऊत (वय ४३ वर्षे, रा. ब्लॉक नं. १३, घर नं. ९४१, सुधीर अपार्टमेंट, उत्तर सदर बाजार, सोलापूर) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विजयकुमार भगवानराव उघडे (रा. ८५२ देगाव रोड, वानकर वस्ती, सोलापूर) यांच्याकडून जय हो साप्ताहिकाच्या माध्यमातून कथितरित्या खंडणी मागितली जात होती. आरोपीने रक्तदान शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक शिबिरातून १० हजार रुपये देण्याची मागणी अप्रत्यक्षरित्या केली होती.

फिर्यादीने असे म्हटले आहे की, आरोपीने अन्य ब्लड बँक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर जय हो साप्ताहिकाची पीडीएफ कॉपी पाठवून खंडणी देण्याची आठवण करून दिली आणि मानसिक त्रास दिला. तसेच, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती छापून ब्लड बँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. या घटनांमुळे फिर्यादीला विनाकारण भेटण्यासाठी दबाव आणला गेला आणि पत्रकाराच्या पदाचा गैरफायदा घेतला गेला.

सदर घटना दि. १५ ऑगस्ट २०२४ ते दि. २२ ऑगस्ट २०२४ या कालावधीत एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर येथे घडली. याबाबत फिर्याद दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ९:१५ वाजता दाखल करण्यात आली.

सदर प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत असून, आरोपी विजयकुमार उघडे यांच्या विरुद्ध खंडणी आणि गैरवर्तणुकीबाबत अधिक तथ्ये शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या