Ticker

6/recent/ticker-posts

लाखनीत पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा हैदोस

महिन्याभरात तब्बल ४७ लोकांना चावा 

स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- लाखनी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून तालुक्याच्या ठिकाणी नागरिक लहान सहान कामाकरिता येत असतात. अशातच मोकाट कुत्र्यांनी हौदोस घातल्याने १ ऑक्टोंबर पासून तब्बल ४७ जणांना चावा घेतल्याची नोंद लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात असून त्यापैकी बरेच रुग्ण जखमा मोठ्या असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात हलविले असल्याची माहिती आहे. तर पिसाळलेल्या कुत्र्याने सर्वाधिक बालकांना चावा घेतला आहे. त्यामुळे स्थनिक प्रशासनाने लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकाराने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 
               गेल्या ३ दिवसात तब्बल १६ जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला असून शनिवारी(ता.२६) ला ३ जणांना रविवारी(ता.२७) ला ८ जणांना सोमवारी(ता. २८) ला २ जणांना तर मंगळवारी(ता.२९) ला ३ जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची माहिती आहे. जखमीमध्ये रेशम उरकुडे १९ वर्ष  लाखोरी, भैरवी भैसारे ८ वर्ष ६ महिने लाखनी, श्रद्धा गिर्हेपुंजे ७ वर्ष लाखनी, प्रियांशु उके ७ वर्ष लाखनी,  सोनू चांदोरकर ३९ वर्ष आचल कोकोडे २५, सोम्यिक हुकरे ४ वर्ष ६ महिने, श्रुती टेंभूर्ने २२, विजू मडावी ४२, महेंद्र वाघाये २७, साक्षी निंबार्ते २५, आर्या नागलवाडे १८, मोनाली चेटूले, अक्षद वालोदे १३ व शैलेश उरकुडे ३२ सर्व रा. लाखनी यांचा समावेश आहे. 
                 लाखनी, मुरमाडी व सावरी हे तिन्ही गावे एकलग असून लाखनी नगरपंचायत आहे तर दोन्ही ग्रामपंचायत आहेत. या तिन्ही गावात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात असून भरदिवसा हल्ले करीत आहेत. शहरातील नगरपंचायत परिसर, मटन मार्केट परिसर, लाखोरी रोड, सेलोटी रोड, आदर्श नगर, पंचायत समिती परिसर, सिपेवाडा रोड,  मुरमाडी येथील तहसील परिसर, कुमार पेट्रोलपंप परिसर, श्रीनगर कॉलनी, शिवनगर कॉलनी, उज्ज्वल नगर, समर्थ मैदान, समर्थ नगर परिसर तर सावरी येथील सावरी ग्रामपंचायत परिसर, स्टेट बँक परिसर, सोमलवाडा रोड, खेडेपार रोड परिसर आदि ठिकाणी मोकाट कुत्र्यांचे झुंड असतात. येणाऱ्या जाणाऱ्या वर पाठलाग करून भुंकतात त्यामुळे किरकोळ अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तर त्यांच्या तावडीत भेटलेल्या इसमाचे लचके तोडत असतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लक्ष देवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या