Ticker

6/recent/ticker-posts

परवानाधारक देशीदारू दुकानातून अवैध विक्रेत्यांना दारू पुरवठा


• पोहरा परवानाधारक देशीदारू दुकानातील प्रकार 

• राज्य उत्पादक शुल्क उपनिरीक्षकाचा आशीर्वाद

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज 
भंडारा :- परवानाधारक देशीदारू दुकानांवर सनियंत्रणाचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे असले तरी "कुंपणच शेत खाते" या प्रमाणे लाखनी तालुक्याच्या प्रभार असलेल्या राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षकाचे आशीर्वादाने पोहरा येथील परवानाधारक देशीदारू दुकान भाड्याने घेतलेल्या परराज्यातील अण्णा नामक इसमाशी अर्थकारण करून मुरमाडी/तूप परिसरातील अवैध दारू विक्रेते तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) वर असलेल्या काही ढाब्यात दुचाकी तथा वेळप्रसंगी चारचाकी वाहनाने अवैध देशी दारूची वाहतूक केली जाते. ही बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षकास माहिती असताना कसलीही कारवाई केली जात नाही. तसेच या परवानाधारक देशीदारू दुकानातून एमआरपी पेक्षा अधिक दराने दारूविक्री करून मद्यपींची आर्थिक लूट केली जाते. या गंभीर बाबीकडे अधीक्षक राज्यात उत्पादन शुल्क यांनी स्वतः लक्ष पुरवून अवैध दारू वाहतूक व एमआरपी पेक्षा अधिक दराने दारूविक्री करण्यावर अंकुश लावणे आवश्यक झाले आहे. 
                    परवानाधारक देशी दारू दुकान तसेच बियर बारवर नियंत्रण ठेवण्यासाठी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे साकोली येथे कार्यालय असून त्यांचे अधिकार क्षेत्रात लाखनी, पवनी, साकोली व लाखांदूर हे ४ तालुके येत असून लाखनी व पवनी ह्या तालुक्यांची जबाबदारी एका पोलिस उपनिरिक्षकाकडे असून असाच प्रकार साकोली व लाखांदूर बाबदही आहे. परवानाधारक देशी दारू दुकाने व बियर बारवर तपासणी करून नियंत्रण ठेवणे, अवैध दारू विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध लावणे, उत्पादनाच्या किमतीपेक्षा अधिक दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे तसेच त्याचा परवाना निलंबित करण्यासाठी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क भंडारा यांचेकडे शिफारस करणे, मोहफुल दारु गाळपावर नियंत्रण ठेवणे शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत दुकान सुरू व बंद होते का यावर नियंत्रण ठेवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे असून त्याकरिता लाखनी तालुक्यात उपनिरिक्षकासह काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
                    पोहरा येथे फुटकळ देशीदारू दुकान असून परवाना क्रमांक सीएल ||| ४६ एन.जी. हटनागर व भागीदार एन. एस. हटनागर यांचे नावे असले तरी हे लायसन भाड्याने एका आंध्र प्रदेश च्या व्यक्तीला देण्यात आले आहे. त्याचे राज्य उत्पादक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे या परवानाप्राप्त देशीदारू दुकानातून मुरमाडी/तूप. परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांना तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) वरील काही ढाब्यांमध्ये दुचाकी व चारचाकी देशीदारू पुरवठा केला जातो. तसेच १८० व ९० मिली देशीदारूचे पव्व्याची किंमत अनुक्रमे ८० व ३५ रुपये असताना अतिरिक्त ५ ते १० रुपये घेऊन मद्यपीची लूट केली जाते. हा सर्व प्रकार लाखनी येथील राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षकास माहीत असताना वरची कमाई बंद होण्याचे भीतीपोटी या नियमबाह्य बाबीवर प्रतिबंध लावण्याचे सौजन्य दाखविले जात नसल्यामुळे या परवानाधारक भाड्याने देशीदारू दुकान चालविणाऱ्या अण्णाची हिमत वाढलाय आहे. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क भंडारा यांनी या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष पुरवून पोहरा येथील परवानाधारक देशी दारू दुकानातून चालणारे गैरप्रकार थांबवून त्याचेवर कारवाई करणे आवश्यक झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या