Ticker

6/recent/ticker-posts

वंचितकडून अविनाश भोसीकर लढवणार नांदेड पोटनिवडणूक!

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीने महाराष्ट्र 16- नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अविनाश भोसीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसचे वसंत चव्हाण या ठिकाणी निवडून आले होते. परंतु, त्यांचे निधन झाल्याने नांदेड लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून अविनाश भोसीकर मैदानात असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती.
---


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या