Ticker

6/recent/ticker-posts

वंचितचे उमेदवार डॉ.नीरज वाघमारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

चित्रा न्युज ब्युरो
यवतमाळ :-यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. नीरज वाघमारे यांनी सोमवारी(28) महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्ह्यातील सर्व बौद्ध भिक्खू , बंजारा  महिला, कोलाम दंडारपथक, मुस्लिम महिला,  आदिवासी, ओबीसी, बौद्ध आणि मुस्लिम बंधू-भगिनी वाघमारे यांच्या नामांकन रॅलीत पारंपरिक वेषात सहभागी झाले होते. 
याप्रसंगी उमेदवार डॉ.नीरज वाघमारे, ॲड. प्रियदर्शी तेलंग, शिवदास कांबळे, गजानन भाऊ सावळे,  प्रफुल शंभरकर, धम्मावती वासनिक, प्रमोद पाटील, कृष्णा भिवनकर, विशाल भाऊ पोले, अरुणभाऊ कपिले, सुशील ताकसांडे, भारती सावते, शोभना कोटंबे, मिलिंद पाटील, किशोर मून, विलास तेलतुंबडे, जीवणे साहेब, शारदाताई मेश्राम, प्रणिता ठमके, अर्चना नगराळे, वैशाली गायकवाड, नंदिनी ठमके, आनंद भगत, प्रसेनजीत भवरे, भागवत साहेब, संजीव अण्णा वाघमारे,मनोजराजा गोसावी, पुष्पाताई शिरसाट- महासचिव, मीनाताई रणीत- उपाध्यक्ष, रत्नमाला कांबळे शहर महासचिव, करुणाताई मून, करुणाताई चौधरी, सविताताई तिडके, शोभनाताई कोटंबे सुकेशनी खोब्रागडे, सुधीर खोब्रागडे, वंदना उरकुडे, विशाल खोब्रागडे हंसराज बांगर, अनिल गजभिये मनोज जांगडे, सुरेश वानखडे, सुमेध कांबळे, संध्याताई काळे, संगीता भवरे, शीलाताई वैद्य, शैलेश भानवे अरविंद दिवे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या