Ticker

6/recent/ticker-posts

श्रद्धेय अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक राजकारणाला बळकटी देण्यासाठी.वंचित बहुजन आघाडीचे डॉ स्नेहा सोनकाटे मॅडम यांना प्रंचड मताने निवडुंन द्यावे.....आर एस गायकवाड जिल्हा सहसचिव वंचित बहुजन आघाडी


मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र  


धाराशिव: - तुळजापूर,,, विधानसभा मतदारसंघ निवडणुकांच्या निमित्ताने धनगर समाजाचे उच्च शिक्षीत अभ्यासु निडर व्यक्तीमत्व डॉ स्नेहा सोनकाटे मॅडम यांच्या गॅस सिलिंडर चिन्हाला मतदान करुन वंचित बहुजन आघाडीचे अर्थात श्रद्धेय अँड बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या लोकशाहीच्या सामाजिक करण्यासाठी आरक्षणाचे लाभार्थी, असणारे सर्व समाज बांधवांनी आपल्या हाती असलेल्या मतदानाचा हक्क प्रामाणिक पणाने बजावून प्रस्थापितांच्या राजकारणाला संपवून टाकले पाहिजे.
आरक्षण वाद्यानो आपणास हि शेवटची संधी आहे.श्रदेय अँड बाळासाहेब आंबेडकरचं आणि वंचित बहुजन आघाडीचं का हवी?
* स्वाभिमानी समाज निर्मितीसाठी
* समाजातील अजारकता शांत करण्यासाठी
* शिक्षणाचे बाजारीकरण थांबवण्यासाठी
* बेरोजगारीला लगाम घालण्यासाठी
*  रोजगार उपलब्ध करण्यासाठी 
* परिवर्तन साहित्य निर्मितीसाठी
* देशाच्या हिताचा अभ्यास निर्माण करण्यासाठी
* राजकारणातील झुंडशाही थांबवण्यासाठी
* राजकीय दादागिरी रोखण्यासाठी
* सामाजिक न्यायाच्या हक्कासाठी
* महामानवांचे विचार प्रस्थापित करण्यासाठी 
* छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी
* महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीसाठी
* संविधानाचे आरक्षण वाचण्यासाठी
* ओबीसी समाजाच्या नेतृत्वासाठी
* एससी एसटी अल्पसंख्यांक आदिवासी यांच्या विकास निधीचे योग्य अंमलबजावणी करण्यासाठी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी आणि देशाच्या तमाम नागरिकांसाठी परिश्रमाने मिळवून दिलेल्या सर्वच मानव उत्कर्षाच्या, त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी श्रद्धेय अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ स्नेहा सोनकाटे मॅडम यांना प्रंचड बहूमताने विजयी ही विनंती
आर एस गायकवाड
वंचित बहुजन आघाडी जिल्हा सहसचिव उस्मानाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या