मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र
धाराशिव: -धाराशिव जिल्हा तील तुळजापूर तालुका अणदूर येथील जिल्हातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली अनदुर ग्रामपंचायत गेली सहा महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार दिला गेला नाही दिवाळी कशी साजरी करावी. त्या कर्मचारी यांचे वर उपासमारीची वेळ आली आहे.माघिल दिवस आठवुन प्रशासनातील बऱ्याच ग्रामसेवकांचे नावे घेऊन आमच्या पुढे त्यांचं कौतुक केलं गेले अनेक दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रशासकीय अधिकारी नसल्यामुळे कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यापूर्वी गाव पुढारी यांचे वाढदिवस साजरे करताना कर्मचाऱ्यांना कपड्याचा आहेर भेट देण्याची परंपरा या गावाने जोपासली होती आता गाव पुढारी ही आमच्याकडे लक्ष देत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना सांगितले तरी शासकीय पातळीवरील अधिकारी यांनी व स्थानिक गाव पुढाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालून कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी करावी अशी मागणी समाज माध्यमातून होत आहे
0 टिप्पण्या