Ticker

6/recent/ticker-posts

धम्माशिवाय मनुष्य जीवन निरर्थक:पूज्य भदंत तव्हंकर

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- नाशिक नगर  येथील मैत्रेय. बौद्ध विहार येथे आषाढ पौर्णिमा मे आश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या वर्षावास समापण कार्यक्रम प्रसंगी पूज्य भदंत सुगत महाथेरो टेकेपार,पूज्य भदंत तव्हांकर नागपूर तथा पूज्य भदंत दिव्यज्योती भंडारा यांचे प्रमुख मार्गदर्शनात धम्म देशना कार्यक्रम संपन्न झाला.
भगवान बुद्धांचा धम्म हा शांती,संतुष्टी देणारा सोपा मार्ग आहे .प्रत्येक मनुष्याने त्रिषरण पंचशील व आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुकरणं केले तर जीवन सुखकर होईल.त्यामुळे जीवन जगण्यासाठी बुद्धाचा धम्म आवश्यक आहे . धम्माशिवाय जीवन निरर्थक आहे असे,पूज्य भंते तव्हेंकर यांनी प्रतिपादन केले.स्वतचेच आत्मपरीक्षण करून विस्कळीत झालेल्या समाजाला संघटीत करणे गरजेचे आहे .आज ६८ वर्षे झाली धम्म स्वीकारून पण अजून ही अंधश्रद्धेतून मानव बाहेर पडला नाही.म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञाचे चे काटेकोरपणे पालन करून धम्म आचरण करावे लागेल त्या शिवाय तरणोपाय नाही असे पूज्य भदंत  सुगत महाथेरोयांनी आपल्या धम्मदेशनात सांगितले.धम्म कार्यात योगदान देणारा मुलगा आई वडिलांनी संस्कारित करावा असे ते म्हणाले.भदंत दिव्य ज्योती यांनी ही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन सौ प्रतिभा मेश्राम,निशा डोंगरे यांनी केले तर प्रस्तावना स्वेता वासनिक यांनी केले .कपिला रामटेके ,विनोद रामटेके,तिलोत्तमा टेंभूरकर यांनी मनोगत व्यक्त केले.  कार्य यशस्वितेसाठी प्रतिभा मेश्राम, निशा डोंगरे ,अंजिरा नागदेवे,माया बागडे,निशा लोखंडे,उषा वासनिक,सुशीला शहारे,सुशीला मडामे, अनिता नागदेवे, जयदीप बागडे,अमरदीप, चित्रा  चीचखे डे यांनी मोलाचे सहकार्य केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या