• सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांची मागणी
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- संततधार पावसाने जिल्ह्यात रोवणी सुरू असताना तसेच धान पीक निसवा होण्याचे अवस्थेत असताना पुराचे पाण्याखाली येऊन धान पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच परतीच्या पावसाने कापणी झालेले धानाचे कळप तसेच मळणी करून वाळण्यासाठी ठेवलेल्या धानाचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकांमधून धान पिकाचा पीक विमा काढलेला आहे. अशा सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट विमा कंपनीने पीक विम्याचा लाभ द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी केली आहे.
जिल्ह्यात बहुतांश शेतजमीन पावसाचे पाण्यावर अवलंबून असल्यामुळे कोरडवाहू आहे. यात ९० ते ११० दिवसांत निघणाऱ्या हलक्या प्रजातीच्या धानाच्या वानाची लागवड केली जाते. खरीप हंगाम २०२४ मध्ये जिल्ह्यातील एकूण खातेदार शेतकऱ्यांपैकी जवळपास ७५ टक्के शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकांकडून धानाचा पीक विमा काढलेला आहे. असे सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांचे म्हणणे आहे.
खरीप हंगाम २०२४ मध्ये सुरुवातीपासूनच धान पिकास अडथळे निर्माण झाले होते. उशिरा पावसामुळे पेरणी उशिरा, रोवणीस सुरुवात झाली असता अतिवृष्टीमुळे धान पीक पाण्याखाली आल्याने नुकसान काहींना दुबार पेरणीही करावी लागली. सध्या धान परिपक्व होण्याचे मार्गावर असताना जिल्ह्यात संततधार पावसामुळे दुसऱ्यांदा पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच परतीच्या पावसात धानाचे कळपे या शिवाय सोसाट्याचे वाऱ्याने उभे पीक शेतात पडून लोंबी पाण्याखाली आल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी धानाची मळणी केली होती व धान मळण्यासाठी शेतात ठेवले होते. त्यांही शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले तरीही विमा कंपनीने विमा उतरविणाऱ्या सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट विम्याचा लाभ द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी केली आहे.


0 टिप्पण्या