Ticker

6/recent/ticker-posts

गडेगाव येथे विविध सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात

विजेत्यांना मंडळाकडून रोख पारितोषिक  

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा -  स्व. सुलोचना पारधीकर बहुउद्देशीय संस्था मासलमेटा, महाबली हनुमान बहु. भजन मंडळ गडेगाव, वनश्नी बहुउद्देशीय भजन मंडळ गडेगाव, माऊली महिला भजन मंडळ गडेगाव, परमात्मा एक सेवक भजन मंडळ गडेगाव, सर्वोदय शारदा भजन मंडळ गडेगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने रोज गुरुवार (ता १० सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजतापासून    नवरात्री उत्सवानिमित्त विविध  सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन   आले होते. दीपप्रज्वलन  डॉ. सोमदत्तजी करंजेकर अध्यक्ष वैनगंगा बहु. शि. सं. साकोली , उद्घाटिका मा. स्वातीताई वाघाये सभापती महिला व बालकल्याण जि. प. भंडारा, मा. सौ. मनिषा हलमारे सदस्या पं. स. लाखनी , सह उद्घाटक मा. महिद्रासिंग कछवाये अध्यक्ष से. सं., मा. सौ. वर्षाताई रेहपाडे सरपंचा, अध्यक्ष मा. अनिल पाटील हारोडे अध्यक्ष म. गां. तं. स. , मा. डॉ. रामनाथजी पारधीकर जिल्हाध्यक्ष, मा.मिलींद खोब्रागडे केंद्रीय सदस्य, मा. प्रेमराज गोटेफोडे कोषाध्यक्ष, मा. केशव फसाटे तालुकाध्यक्ष, मा. प्रभाकर लिचडे, इ. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या भजन व दांडिया/नृत्य स्पर्धेत एकूण २१ मंडळानी भाग घेतला .होता.  शिवशक्ती महिला भजन मंडळ निलागोंदी  प्रथम , गुरुदेव भजन मंडळ गिरोला/पहाडी द्वितिय  तर गायत्री महिला भजन मंडळ लाखनी यांना तृतीय पुरस्कार  प्रदान करण्यात आला.    दांडिया/नृत्य स्पर्धेत वनश्नी बहुउद्देशीय महिला भजन मंडळ गडेगाव यांना प्रथम , प्रगती महिला दांडिया मंडळ गडेगाव यांना द्वितीय  तर श्नी. महाबली हनुमान महिला दांडिया मंडळ गडेगाव यांना तृतीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.  विजेत्यांना  रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद खोब्रागडे ,   प्रास्ताविक  डॉ. रामनाथ पारधीकर तर आभार सिंधू कुथे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी तिमेशर फसाटे, अनिल झोडे, विश्वनाथ जगनाडे, यशवंत जगनाडे,  विलास बाभरे,  रामदास कुथे, योगराज कुथे, कोमल झोडे,  सिंधु कुथे,  माया गुरनुले, अंजीरा फसाटे, मुक्ता बांते, आशा बांते,  सुमित्रा फसाटे, कल्पना फसाटे यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या