Ticker

6/recent/ticker-posts

साकोली विधानसभा क्षेत्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार?



काँग्रेसचा व्होट बँक इतरत्र वळणार

किल्ला वाचविण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा: - कोणत्याही क्षणी आचार संहिता लागू होण्याचे संकेत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले असून साकोली विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे वाट्याला गेल्याचे विश्वसनीय वृत्त असून काँग्रेसकडून आ. नाना पटोले विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित असून भाजपा कडून अनेक दावेदार आहेतं पण डॉ सोमदत्त करंजेकर किंवा प्रकाश बाळबुद्धे यांचेत रस्सीखेच आहे. वंचित बहुजन आघाडीकडून डॉ अविनाश नान्हे हे उमेदवार आहेत. या विधानसभा निवडणुकीत   अनेक बदल घडून येणार असल्यामुळे प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली असून विव्ह रचनेत व्यस्त असले तरी याआधीच्या लोकप्रतिनिधींनी क्षेत्राचा कोणता विकास केला हे सर्वश्रुत असल्यामुळे साकोली विधानसभा क्षेत्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार का ? अशा चर्चांना पेव फुटले आहे . 
         २०१९ चे विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय व प्रादेशिक पक्षांनी स्वबळावर निवडणुक लढविली होती . भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार निवडून आले असताना सुद्धा शिवसेनेशी काही कारणामुळे बिंनसल्याने युवती झाली नाही शेवटी राजकारणात चाणक्य समजल्या जाणाऱ्या खा. शरदचंद्र पवार यांनी भिन्न विचारधारेच्या शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस ची मोट बांधून महविकास आघाडी असे नामकरण करून राज्यात सत्ता स्थापन केली. सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपास नाईलाजाने विरोधात बसावे लागल्याचे शल्ले बोचत होते . सत्ता उलथवण्याच्या शोधात असलेल्या भाजपास आयतेच ओळीत मिळाले. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्त्वात ४० आमदार फुटून भाजपा सोबत सरकार स्थापन केली. ६ महिन्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अजित पवार यांचे नेतृत्त्वात फूट पडून भाजपा - शिवसेना (शिंदे गट) - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) याचे महायुती सत्तेत तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विरोधी पक्षात आहेत. 
          साकोली विधानसभा मतदार संघात लाखनी , साकोली व लाखांदूर तालुक्याचा समावेश होतो. क्षेत्र पुनर्रचनेनंतर २००९ पासून या विधानसभा क्षेत्रावर भाजपाचे प्राबल्य राहिल्याचे दिसून येत असले तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले आजघडीश या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने त्यांचेकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविल्यामुळे त्यांचे साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये दुर्लक्ष होऊन विकासकामे  खोळंबल्याच्या मतदारांत चर्चा होत आहेत. जनतेची कामे करण्याची धुरा आ. नाना पटोले यांनी सोपविली होती त्यांच्याकडून जनतेची कामे करण्याचे सौजन्य दाखविले गेले नाही तसेच फोन उचलण्याचे ही टाळीत असल्याने विद्यमान   आमदाराविषयी जनतेत नाराजीचा सूर आहे. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत संविधान रक्षणाचे नावावर बौद्ध समाजाने काँग्रेसला भरभरून मते दिली व मृतप्राय झालेल्या पक्षास नवसंजीवनी दिली त्यानंतर २ महिन्यात अनुसूचित जाती -  जमातीचे उपवर्गीकरण करण्यात यावे असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने त्यावर प्रतिक्रिया देण्याचे सौजन्य काँग्रेसने दाखविले नाही त्यामुळे बौध्द समाज काँग्रेसवर नाराज आहे . 
          साकोली विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीत काँग्रेसला तर महायुतीतून भाजपाचे कोट्यात तिकीट गेली असून काँग्रेसकडून विद्यमान आमदार नाना पटोले निवडणूक लढणार आहेत तर भाजपाकडून डॉ. सोमदत्त करंजेकर व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांच्यात काट्याची टक्कर असली तरी डॉ सोमदत्त करंजेकर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ असल्यामुळे शेवटचे क्षणी ते बाजी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही . वंचित बहुजन आघाडीने ही  तळागाळातील उमेदवार डॉ अविनाश नांन्हे यांना तिकीट दिली आहे. वृत्त लिहिपर्यंत बहुजन समाज पक्षाने उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते . साकोली विधानसभा क्षेत्राचे सध्याचे चित्र पाहता काँग्रेसचा  व्होट बँक समजल्या जाणाऱ्या अनुसूचित जाती(बौद्ध) , भटक्या जाती विमुक्त जमाती(ढीवर) , गोवारी समाज इतरत्र जाण्याची शक्यता असल्यामुळे याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे साकोली विधानसभा क्षेत्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार का? अशा मतदारांत चर्चा होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या