चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर :-पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माढा, पंढरपूर आणि इतर मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून, पंढरपूरसह पाचही मतदारसंघांतील उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर ठेवले आहे. बावनकुळे यांनी सांगितले की, "पाचही मतदारसंघांमध्ये भाजपसाठी मोठी ताकद उभी राहील, आणि प्रशांत मालकांनी निवडणुकीची जबाबदारी स्विकारली आहे."
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "प्रशांत मालक हे विधानसभेत दिसतील आणि येथील जनतेची त्यांच्याकडून अपेक्षा आहे." माढा, करमाळा आणि माळशिरस येथे निवडणुकीसाठी भाजपच्या रणनीतीचा गनिमी कावा दिसत आहे. तसेच, त्यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली.
बावनकुळे यांनी भाजप आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील हे पक्षातच असल्याचे सांगितले आणि शेतकरी व महिलांचा पक्षाच्या मागे ठामपणे पाठिंबा असल्याचे नमूद केले. तसेच, पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचा पुनरुच्चार केला.


0 टिप्पण्या