Ticker

6/recent/ticker-posts

अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला

• एसडीपीओ पथक भंडारा ची कारवाई 

• २० लाख ३६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- वरठी पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध रेती वाहतूकिवर कारवाई करण्याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी भंडारा चे पथक पट्रोलिंग करीत असताना अशोक लेलँड कंपनीचा १० चक्का टिप्पर क्रमांक एमएच ४० बीएल १८५८ ने बीड मार्गे सातोना कडून शहापूर कडे विना परवाना अवैध रेतीची वाहतूक करतांना सोमवार(ता.२८ ऑक्टोबर) रोजी दुपारी १२:५० मिळून आल्याने टिप्पर चालक, मालक व क्लिनर यांचेवर वरठी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून २० लाख ३६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींची नावे चालक मुकेश महादेव तुमसरे(३१) रा. सालई, तालुका तुमसर, मालक राकेश लीलाधर भिलावे(२७) रा. घोगर, तालुका तिरोडा तथा क्लिनर सूरज सुभाष कुथे(३१) रा. निलज/बु., तालुका मोहाडी असे आहेत. या घटनेमुळे रेती तस्करांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
                       जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्याकरिता सर्वच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात विशेष पथक तयार करून अवैध दारू विक्री, रेती तस्करी, अवैध सट्टा, चोऱ्या, गोतस्करी रोकथाम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या करिता उपविभागीय पोलिस अधिकारी भंडारा चे पथकातील पोलिस हवालदार सुभाष राठोड, साजन वाघमारे, पोलिस अंमलदार वैभव काळे, विजय राघोर्ते, रोहन काळे हे वरठी पोलिस ठाण्याचे परिसरात अवैध रेती वाहतूक कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना बीड मार्गे सातोना चौकाकडून शहापूर कडे जाणाऱ्या रस्त्याने यातील चालक मुकेश तुमसरे व क्लिनर सूरज कुथे याचेसाह मालक राकेश भेलावे यांचे सांगण्यावरून चालकाने आपले ताब्यातील १० चक्का टिप्पर मध्ये ६ ब्रास रेती विना परवाना(विना रॉयल्टी) अवैधरित्या वाहतूक करतांना सातोना येथे शहापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर मिळून आल्याने पंचासमक्ष कारवाई करून क्लिनर व चालकासह अशोक लेलँड कंपनीचा १० चक्का टिप्पर क्रमांक एमएच २० बीएल १८५८ किंमत २० लाख व ६ ब्रास रेती किंमत ३६ हजार असा एकूण २० लाख ३६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलिस ठाणे वरठी येथे देण्यात आले. पोलिस हवालदार साजन वाघमारे यांचे फिर्यादी वरून वरठी पोलिसांनी चालक मुकेश तुमसरे, मालक राकेश भेलावे, क्लिनर सूरज कुथे यांचे विरुद्ध अपराध क्रमांक २३४/२०२४ कलम कलम ३०३(२), ४९, ३(५) भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम(गौण खनिज) सहकलम ४८(८), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे सहकलम ७, ९ आणि मोटारवाहन कायदा सहकलम १३९/१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून रेती सह टिप्पर पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिस ठाणे वरठी येथे ताब्यात दिल्याने आरोपी टिप्पर चालक, मालक, क्लिनर ला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर यांचे मार्गदर्शनात करण्यात आली. या कारवाईमुळे रेती तस्करांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या