कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेत जि प नुतन विद्यालय मुंढरी/बु येथील विद्यार्थांनी चमकदार कामगिरी करत यश सपांदन करून जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत. १४ वर्षे वयोगटा मध्ये कु. विवेकी शेन्डे १०० मी रनिंग, द्वितीय. रितीक भुसारी ४०० मीरनिंग प्रथम व गोळा फेक द्वितीय क्रमांक. चेतन नेरकर ६०० मी रनिंग प्रथम, तेजेस सोनवाने ६०० मी रनिंग द्वितीय, व लांब उडी प्रथम क्रमांक पटकाविला. १७ वर्ष वयोगटात कु. नम्रता शेन्डे हिने १०० मी. रनिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय मुख्याध्यापक एस.जी. पाल , क्रीडा शिक्षक डी. एस. ब्राम्हणकर, ओ. आर . लेंढे, के. डी. शहारे यांचेसह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले आहे. जिल्हा परिषद सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष नरेश ईश्वरकर, पंचायत समिती सदस्य उमेश भोंगाडे, सामाजिक कार्यकर्ता अनमोल साखरे, नितीन भोयर, मोरेश्वर गोमासे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी विद्यार्थांचे कौतूक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


0 टिप्पण्या