पोहरा पुलिया जवळील प्रकार
नुकसानग्रस्त महिलेची पोलिसांत तक्रार
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यातील मानेगाव /सडक ते पालांदुर प्रमुख राज्य मार्गावरील पोहरा पुलिया लगत रस्त्याचे बाजूला फळ विक्री करीत असलेल्या महिलेला दुचाकीने आलेल्या ३ इसमांनी चाकूचा धाक दाखवून गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची घटना शनिवार (ता २६ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजता दरम्यान उघडकीस आली. महिलेने आरडाओरड करताच चोरटे दुचाकीने पसार झाले. पिडीत महिलेचे नाव वंदना शंकर दिघोरे (४७ ) राहणार पोहरा ,तालुका लाखनी असे आहे. या घटनेमुळे पोहरा आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची फिर्याद पोलीस ठाणे लाखनी येथे करण्यात आली आहे .वृत्त लीहीपर्यांत चोराचा शोध लागला नव्हता.
मानेगाव /सडक ते पालांदूर हा प्रमुख राज्यमार्ग असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ सह चंद्रपूर ते नागपूर महामार्गास जोडतो. शॉर्टकट म्हणून या मार्गावरून बरीच वाहने धावत असतात. प्रवाश्यांना संत्री ,पेरू , टरबूज , खरबूज ,शिंगाडे यासारखी फळे उपलब्ध व्हावी याकरिता वंदना दिघोरे ह्या मागील अनेक वर्षापासून मानेगाव /सडक ते पालांदूर मार्गावरील पोहरा पुलीयाजवळ रस्त्याचे कडेला फळ विक्रीचे दुकान लावीत असत . शनिवारी दुपारी ३ वाजता दरम्यान रस्ता सूनसान असल्याची संधी साधून दुचाकीने चेहऱ्यावर स्कार्फ बांधून ३ इसम आले . सुनसान रस्ता व आजूबाजूचे शेतशिवारात कोणीही नसल्याची संधी साधून एकाने फळ विक्रेत्या महिलेला चाकू दाखवून आरडाओरड करू नकोस अशी धमकी देऊन तिच्या गळ्याला धारदार चाकू लावून काही क्षणातच गळ्यातील सोन्याचे दागिने तोडून दमदाटी करून आलेल्या दुचाकीने दागिने घेऊन पसार झाले . पिडीत महिलेने घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली . घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता पोलीस पथक तयार करुंन चोरटे ज्या दिशेने पळून गेले तिकडे रवाना करण्यात आले . वृत्त लीहीपर्यंत पोलीस ठाणे लाखनी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तसेच चोरांचा सुगावा लागला नसल्यामुळे अटक केली गेली नव्हती . या घटनेबाबद माहिती होताच पोहरा आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 टिप्पण्या