• एसडीपीओ पथक भंडारा ची कारवाई
• १५ लाख १८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- मोहाडी पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध रेती वाहतूकिवर कारवाई करण्याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी भंडारा चे पथक पट्रोलिंग करीत असताना विना क्रमांकाचे ३ ट्रॅक्टर सुकळी शेतशिवारात विना परवाना अवैध रेतीची वाहतूक करतांना मंगळवार(ता.२९ ऑक्टोबर) रोजी पहाटे ४:०० वाजता मिळून आल्याने ट्रॅक्टर चालक व मालकावर मोहाडी पोलिस ठाण्यात विविध गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ लाख १८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी ट्रॅक्टर चालक/मालकाचे नाव दशरथ विठ्ठल शहारे(४२), चालक सुनील लक्ष्मण चौधरी(२३), मालक हंसराज बिसन राऊत(३२), विकास कार्तिकस्वामी मेश्राम(२२), मालक कार्तिकस्वामी सोमा गोमासे(५२) सर्वच राहणार सुकळी, तालुका तुमसर अशी आहेत. या कारवाईने अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्याकरिता सर्वच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात विशेष पथक तयार करून अवैध दारू विक्री, रेती तस्करी, अवैध सट्टा, चोऱ्या, गोतस्करी रोकथाम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या करिता उपविभागीय पोलिस अधिकारी भंडारा चे पथकातील पोलिस हवालदार सुभाष राठोड, साजन वाघमारे, पोलिस अंमलदार वैभव काळे, विजय राघोर्ते, रोहन काळे हे मोहाडी पोलिस ठाण्याचे परिसरात अवजध रेती वाहतूक कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना सुकळी शिवारामध्ये ३ ट्रॅक्टर चे चालक दशरथ शहारे, सुनील चौधरी, विकास मेश्राम यांनी त्यांचे मालक दशरथ शहारे, हंसराज राऊत, कार्तिकस्वामी गोमासे यांच्या सांगण्यावरून आरोपी चालकांचे ताब्यातील ३ ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये ३ ब्रास रेती विना परवाना(विना रॉयल्टी) अवैधरित्या चोरिने वाहतूक करतांना मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुकळी शिवारात मिळून आल्याने वेळीच पंचासमक्ष कारवाई करून चालकासह रेतीने भरलेले ३ ट्रॅक्टर ट्रॉली एकूण किंमत १५ लाख व ३ ब्रास रेती किंमत १८ हजार रुपये असा एकूण १५ लाख १८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलिस ठाणे मोहाडी येथे ५ आरोपीं विरुद्ध पोलिस शिपाई वैभव काळे याचे फिर्यादीवरून अपराध क्रमांक २७१/२०२४ कलम ३०३(२), ४९, ३(५) भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम(गौण खनिज) सहकलम ४८(८), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे सहकलम ७, ९ आणि मोटारवाहन कायदा सहकलम ३(१), १३९/१७७ नुसार ट्रॅक्टर चालक/मालक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रेती सह ट्रॅक्टर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीसह मुद्देमाल ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात करण्यात आली. या कारवाईने अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


0 टिप्पण्या