Ticker

6/recent/ticker-posts

धान पीक आणेवारीच्या प्रचलित पद्धतीत बदल करावा

 सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांची मागणी 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- धान उत्पादक शेतकऱ्याकडून यांत्रिक व शास्त्रीय पद्धतीने धान शेती केली जात असल्यामुळे उत्पादनाचे प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. पण शासनाकडून धान पीक आणेवारी(पैसेवारी) काढतांना इंग्रजकालीन शतकापूर्वीच्या प्रचलित पद्धतीचा उपयोग केला जातो. त्यामुळे धानाचे सकल उत्पादनाबाबद संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे आणेवारी ची प्रचलित पद्घती बदलविण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी केली आहे. 
                       पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर हे धान उत्पादक जिल्हे म्हणून राज्यात सुपरिचित आहेत. पण उपजाऊ शेतजमिनीत सिमेंट चे जंगल उभे राहिल्यामुळे दिवसेंदिवस पिकाखालील क्षेत्र कमी होत असले तरी शेतकऱ्यांनी नव-नवीन पीक पद्धतीचा अंगीकार केल्याने उत्पादनात प्रचंड प्रमाणात भर पडत आहे. धान उत्पादक शेतकरी यांत्रिक व शास्त्रीय पद्धतीच्या शेतीकडे वळल्यामुळे सुधारित बी-बियाणांचा वापर, सेंद्रिय व रासायनिक खताचे योग्य नियोजन, पिकास नियमित पाण्याच्या पाळ्या देणे, रोवणी पूर्वी हिरवळीचे खताचा वापर, अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची लागवड आणि कीटकनाशकांचा वापर यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. असे सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांचे म्हणने आहे. पण धान पिकाची आणेवारी मोजमापाकरिता १३० वर्षापूर्वीच्या इंग्रजकालीन पध्दतीचाच उपयोग आजही सुरू असल्यामुळे सरकारी आकडे व वस्तुस्थिती यात बरीच तफावत आढळून येते. त्यामुळे धान पिकाच्या सकल उत्पादनाबाबद संभ्रम निर्माण होतो. आणेवारीची पद्धती बदलविने हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे संसदेच्या येत्या अधिवेशनात भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रयत्न करावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी केली आहे. 
*असे होते आणेवारीचे मोजमाप(चौकट)*
धान पिक परिपक्व झाल्यावर तलाठ्यामार्फत रँडम पद्धतीने ईश्वरचिट्ठीव्दारे शेतजमिनीची निवड केली जाते. ज्या शेतकऱ्याची शेती आणेवारीस निवड करण्यात आली असेल त्या गटातून १० बाय १० मीटर जागा निश्चित करून धान कापून मळणी करून धानपिकाची मोजमाप केली जाते. २० ते २५ कीलो ग्रॅम धान झाल्यास १०० टक्के उत्पन्न आल्याचे गृहीत धरले जाते. म्हणजेच हेक्टरी १५ क्विंटल धान झाले असे गणित आहे. 

हा दूजाभाव कशासाठी

शासनाकडून कोरडवाहू शेतजमिनीस १९ हजार ५०० रुपये व जलसिंचित शेतीस एकरी २२ हजार ५०० रुपये पीक कर्ज दिले जाते. हमीभावाप्रमाने १० ते १२ क्विंटल धानासाठी पीक कर्ज देण्यात येते. तर शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात एकरी १८ क्विंटल धान्य शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाते. पीक कर्ज हेक्टरी २५ क्विंटल व धान खरेदी हेक्टरी ४५ क्विंटल केली जाते. मग आणेवारी हेक्टरी १५ क्विंटल. असा दूजाभाव कशासाठी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या