Ticker

6/recent/ticker-posts

अवैध रेती वाहतूक करणारा टीप्पर पकडला

• एसडीपीओ पथक भंडारा ची कारवाई 
• २२ लाख ५४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- करडी पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध रेती वाहतूकिवर कारवाई करण्याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी भंडारा चे पथक पट्रोलिंग करीत असताना टाटा कंपनीचा १२ चक्का टिप्पर क्रमांक एमएच ३६ एबी २७९१ ने तिरोडा कडून तुमसर कडे विना परवाना अवैध रेतीची वाहतूक करतांना गुरुवार(ता.२४ ऑक्टोबर) रोजी मिळून आल्याने टिप्पर चालक, मालक व क्लिनर यांचेवर करडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून २२ लाख ५४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींची नावे चालक प्रशांत विनोद तिडके(३१) रा. मानोरा, टोला तिरोडा. मालक दिनेश ढोके(४०) रा. तुमसर तथा क्लिनर सतीश उमराव सिंगनजुडे(३०) रा. खरबी, तालुका तुमसर असे आहेत. या घटनेमुळे रेती तस्करांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
                       जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्याकरिता सर्वच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात विशेष पथक तयार करून अवैध दारू विक्री, रेती तस्करी, अवैध सट्टा, चोऱ्या, गोतस्करी रोकथाम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या करिता उपविभागीय पोलिस अधिकारी भंडारा चे पथकातील पोलिस हवालदार सुभाष राठोड, साजन वाघमारे, पोलिस अंमलदार वैभव काळे, विजय राघोर्ते, रोहन काळे हे करडी पोलिस ठाण्याचे परिसरात अवैध रेती वाहतूक कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना तिरोडा कडून तुमसर कडे येणाऱ्या रस्त्याने चालक प्रशांत तिडके व मालक दिनेश ढोके यांना सतीश सिंगणजुडे यांचे सांगण्यावरून त्याचे ताब्यातील १२ चक्का टिप्पर मध्ये ९ ब्रास रेती विना परवाना(विना रॉयल्टी) अवैधरित्या वाहतूक करतांना देव्हाडा/बुज. येथे राष्ट्रीय महामार्गाने मिळून आल्याने पंचासमक्ष वेळीच कारवाई करून क्लिनर व चालकासह टाटा कंपनीचा १२ चक्का टिप्पर क्रमांक एमएच ३६ एबी २७९१ किंमत २२ लाख व ९ ब्रास रेती किंमत ५४ हजार असा एकूण २२ लाख ५४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलिस ठाणे करडी देण्यात आले. पोलिस हवालदार साजन वाघमारे याची फिर्यादी वरून करडी पोलिसांनी प्रशांत तिडके, दिनेश ढोके, सतीश सिंगणजुडे यांचे विरुद्ध अपराध क्रमांक १६९/२०२४ कलम कलम ३०३(२), ४९, ३(५) भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम(गौण खनिज) सहकलम ४८(८), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे सहकलम ७, ९ आणि मोटारवाहन कायदा सहकलम  १३९/१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून रेती सह टिप्पर पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिस ठाणे करडी येथे ताब्यात दिल्याने आरोपी टिप्पर चालक, मालक, क्लिनर ला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर यांचे मार्गदर्शनात करण्यात आली. या कारवाईमुळे रेती तस्करांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या