Ticker

6/recent/ticker-posts

मधमाश्यांच्या हल्ल्यात २ महिला कर्मचारी जखमी

शासकीय मुलींच्या वसतीगृहालगत शेतशिवारातील प्रकार  

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-लाखनी येथील शासकीय मुलींच्या वसतीगृहालगत असलेल्या शेतशिवारात किन्हीचे झाडावर असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यातील माशांनी अचानक हल्ला केल्याने दोन महिला कंत्राटी कर्मचारी जखमी झाल्याची घटना गुरुवार (ता२८ नोव्हेंबर) रोजी उघडकीस आली. त्याचेवर ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे उपचार करून सुट्टी देण्यात आली. जखमीची नावे राजश्री दिलीप पडोळे (३८) रा. मुरमाडी /सावरी व कीर्ती नितीन बेलेकर(३५) राहणार सानगडी अशी आहेत . या घटनेमुळे वसतीगृह परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 
        ग्रामीण परिसरातील दारिद्रय रेषेखालील व गरीब कुटुंबातील हुशार मुलींना तालुका स्तरावर शिक्षणाची सोय व्हावी याकरिता सामाजिक न्याय विभागाकडून वसतीगृह चालविले जातात . लाखनी येथे राकेश बावनकर यांचे घरी भाड्याने शासकीय मुलींचे वसतिगृह असून त्यात अनुसूचित जाती जमातीच्या ६० ते ७० विद्यार्थिनी निवास करीत आहेत. बुधवारी सायंकाळचे सुमारास या वसतीगृहात कार्यरत कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनी साफसफाई करून केरकचरा लगतच्या शेतशिवारात जाळण्यासाठी नेला. जाळत असताना धूर निघून किन्हीचे झाडावरील मधमाश्यांच्या पोळ्याला लागताच मधमाशा सैरावैरा उडून केरकचऱ्यास आग लावणाऱ्या महिला कर्मचारी राजश्री व कीर्ती याच्यावर हल्ला केला त्यात त्या जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेण्यात आले . कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांच्यावर उपचार केले. उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. या घटनेमुळे वसतीगृह परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या